लग्नाला झाले चार महिने अन् पत्नीला सोडून कावड यात्रेला गेला पती, नंतर दुसऱ्याच तरुणासोबत पत्नी...पतीनं उचललं टोकाचं पाऊल

Crime News : कावड यात्रेसाठी गेलेल्या तरुणाला आपल्या पत्नीच्या अफेयरबाबत कळालं. त्यानंतर तरुणाने टोकाचं पाऊल उचललंय.

extra marrital affair
extra marrital affair
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कावड यात्रेला गेलेला पती घरी परतला नाही

point

पत्नीचं होतं दुसऱ्या पतीसोबत प्रेमसंबंध

point

पतीनं उचललं टोकाचं पाऊल

Crime News : उत्तर प्रदेशातील नोएडातून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका तरुणीचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. श्रावण महिन्यात उत्तर भारतात कावड यात्रेची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. या कावड यात्रेसाठी पती गेला असता, त्यानंतर त्याला कळाले की त्याची पत्नी दुसऱ्या तरुणासोबत पळून गेली आहे. ही बातमी एकताच पती कावड यात्रा सोडून घरी परतला. कुटुंबातील सदस्यांच्या मते, या घटनेनंतर तो अस्वस्थ झाला होता. त्यानंतर त्याचा मानसिक स्थिती सतत बिघडली गेली होती. दरम्यान, या पीडित तरुणाचे नाव अंकित असे आहे.

हे ही वाचा : धावत्या लोकलमधून चोरट्याने मोबाईल हिसकावला, प्रवाशाचा गेला तोल अन् पाय चिरडले, नेमकं ठाण्यात काय घडलं?

तरुणाने आत्महत्या करत तरुणाचं टोकाचं पाऊल 

या त्रासामुळे आणि धक्क्यामुळे अंकितने आत्महत्या करत टोकाचं पाऊल उचचले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ देखील बनवला आहे. ज्यात तो अंतिमक्षणी सर्वांना बाय-बाय म्हणताना दिसून येत आहे.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या अंकितच्या कुटुंबाने त्याची पत्नी, आणि तिच्या आई वडिलांसह एका अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास केला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून संबंधित प्रकरणात क्रिश नावाच्या तरुणाचं नाव समोर आलं. संबंधित प्रकरणात पोलिसांनी क्रिशच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नोएडा पोलिसांनुसार, या प्रकरणात पोलिसांनी काही खोटे नाटे आरोप केल्याचं आढळून आले. परंतु, तपास अजूनही सुरू आहे. फरार झालेल्या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सतत छापे टाकले आहेत.

दरम्यान, सध्या मोठ्या प्रमाणात अनैतिक संबंधाच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. पत्नी आपल्या बॉयफ्रेंडसाठी आपल्या पतीची हत्या करते. या वर्षभरात मोठ्या प्रमाणात अनैतिक संबंधाच्या प्रकरणामुळे गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लग्नासाठी पत्नी काशी मिळेल? असा प्रश्न असंख्य तरुणांच्या मनात घोंगावतो. 

हे ही वाचा : पत्नीचं बाहेर होतं लफडं, पतीला कळताच दोघांमध्ये झाला वाद, महिलेनं निर्जनस्थळी नेलं अन् ...

 

हे वाचलं का?

    follow whatsapp