4 मुलांचा बाप.. 5 मुलांच्या मेहुणीला घेऊन पळला, पत्नीही पाचव्यांदा गरोदर…

ADVERTISEMENT

Father of 4 children ran away with sister-in-law of 5 children wife also pregnant for the fifth time
Father of 4 children ran away with sister-in-law of 5 children wife also pregnant for the fifth time
social share
google news

दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

UP Crime: जो तरुण मेहुणीला घेऊन पळून गेला आहे त्याचे नाव सलीम हा फर्रुखाबादमधील (UP Farrukhabad) राहणारा आहे. जिच्यासोबत तो पळून गेला आहे ती त्याच्या पत्नीची बहीण आहे. मात्र ही घटना घडल्याचे लक्षात येताच अनेकांना धक्का बसला आहे. जिच्यासोबत पळून गेला आहे, तिला पाच मुलं असून त्यालाही चार मुलं असल्याचं सांगण्यात आले. तर पाचव्या वेळी पुन्हा एकदा त्याची बायको गरोदर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मेहुणीला घेऊनच फरार

या प्रकरणाची माहिती देतान पोलिसांनी सांगितला की, आरोपीची पत्नी ही पाचव्या वेळी गर्भवती होती, तिच्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी त्याने मेहुणीला घरी आणून ठेवले होते. त्यानंतर काही दिवस घरातील लोकंही संभ्रमवस्थेत होती. मात्र त्यानंतर पाच दिवसांनी मेहुणीला घेऊन फरार झाल्याची ती घटना घडली. त्यानंतर याबाबत पोलिसात तक्रारही देण्यात आली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> 12th fail : IPS मनोज कुमार शर्माचं महाराष्ट्र कनेक्शन, ‘या’ शहरांत होते अधिकारी

पत्नी पाचव्यांदा गर्भवती

या प्रकरणातील पीडित कुटुंबाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमधील कर्नालमधील घरौंडामध्ये राहणार आहे. त्याला चार मुलं असून त्याची पत्नी आताही गर्भवती आहे. त्याने आपल्या गर्भवती पत्नीची काळजी घेण्यासाठी त्याने मेहुणीला घरी आणून ठेवले होते.

प्रेमसंबंधामुळं संभ्रम

मेहुणीला घरी आणण्यासाठी त्याने अनेकदा त्याने सासरवाडीच्या लोकांना विनंती केली होती, त्यानंतरच त्यांनी तिला त्याच्या घरी पाठवले होते. त्या दोघांमध्ये काही दिवस प्रेमसंबंधही चालले होते, मात्र त्याची कल्पना कोणालाच नव्हती. मेहुणीला घेऊन पळून गेलेल्या त्या दोघांचाही शोध गेल्या सहा ते सात दिवसांपासून घेतला जातो आहे. मात्र अजूनही ती दोघं सापडली नाहीत. त्यामुळे आता पोलिसात तक्रार दाखल करून त्या दोघांना पकडण्याची विनंती कुटुंबीयांनी केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>‘लोकसभेनंतर राज्यात राजकीय भूकंप’, पंतप्रधानांसमोरच CM शिंदेंचं मोठं विधान

    follow whatsapp

    ADVERTISEMENT