Hardik Pandya ला कोट्यवधी रूपयांचा चुना, सावत्र भावालाच अटक; नेमकं प्रकरण काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Hardik Pandya and Krunal Pandya cheated by step Brother :  भारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) हार्दिक आणि कृणाल पंड्या (Hardik-krunal Pandya) यांचा सावत्र भाऊ वैभव पंड्या (Vaibhav Pandya) याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. वैभववर हार्दिक-कृणालसोबत व्यवसाय भागीदारीत सुमारे 4.3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. (Hardik Pandya and Krunal Pandya cheated by step Brother Vaibhav Pandya for rupees 4.3 crore

मिळालेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय वैभववर पार्टनरशिप फर्मकडून सुमारे 4.3 कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे हार्दिक-कृणालचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कथित प्रकरणात चुकीच्या कामात निधीचा गैरवापर आणि भागीदारीच्या अटींचे उल्लंघन यांचा समावेश आहे.

वैभवने स्वत:च्याच भावांना लावला कोट्यवधी रूपयांचा चुना!

2021 मध्ये हार्दिक, कृणाल आणि वैभव अशा तिघांनी मिळून पॉलिमर व्यवसाय सुरू केला. यामध्ये भागीदारीच्या अटी होत्या की, क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या 40-40 टक्के भांडवल गुंतवतील. तर, सावत्र भाऊ वैभव 20 टक्के भागीदारी देईल आणि व्यवसायाचे दैनंदिन काम तोच सांभाळेल. त्यानुसार व्यवसायातील नफाही वितरित केला जाईल.'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तर याप्रकरणात वैभववर त्याच क्षेत्रात काम करणारी दुसरी फर्म आपल्या भावांना न सांगता स्थापन केल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे त्याने व्यापार कराराचे उल्लंघन केले. मिळालेल्या माहितीनुसार, असे केल्याने कंपनीचा नफा कमी झाला आणि करोडोंचे नुकसान झाले. वैभव पांड्याने गुपचूप कंपनीतील आपली भागीदारी २० टक्क्यांवरून ३३.३ टक्के केली. त्यामुळे दोन्ही क्रिकेटपटू भावांचे नुकसान झाले.

सध्या हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या IPL 2024 खेळत आहेत. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. तर, कृणाल पंड्या लखनौ सुपरजायंट्स संघाकडून खेळत आहे. 

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT