Crime : बापच निघाला नराधम; ’15 वर्षांच्या पोटच्या मुलीला बेशुद्ध करुन…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Father Raped minor daughter in Hingoli, Maharashtra
Father Raped minor daughter in Hingoli, Maharashtra
social share
google news

Hingoli Crime News :

ADVERTISEMENT

ज्ञानेश्वर पाटील, 

हिंगोली : येथून मुलगी-वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. सुट्टीला घरी आलेल्या 15 वर्षांच्या पोटच्या मुलीवर वडिलांनीच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या मामा आणि आईने सेनगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून अल्पवयीन मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. प्रभाकर पाईकराव (55 वर्ष) असं अटक केलेल्या वडिलांचं नाव आहे. (Father Raped minor daughter in Hingoli, Maharashtra)

हे वाचलं का?

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अल्पवयीन पीडितेच्या आईचा आणि वडिलांचा 15 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यामुळे लहानपणापासूनच ती तिच्या आईसमवेत मामाच्या घरी राहायची. यावर्षी शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असताना ती वडिलांच्या घरी आली होती. वडील गावातच मजुरी काम करायचे.

हे ही वाचा : वासनांधांकडून मृतदेहावर बलात्कार… आई-वडील लावतायेत मुलींच्या कबरीला कुलूप!

दरम्यान. एक दिवस वडिलांनी पीडितेला गुलाबजाम, भेळ आणि कलाकंद खाऊ घातला. त्यानंतर ती बेशुद्ध पडली. यानंतर वडिलांनी पीडित मुलीचा आधी विनयभंग केला आणि नंतर हात-पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. शुद्धीत आल्यानंतर मुलीला त्रास होऊ लागला, आपल्यासोबत काही तरी घडल्याच जाणवलं. यावर वडिलांनी तिला मारहाण करून धमकी दिली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Crime : मुलीच्या तोंडात कापड टाकून टॉयलेट क्लिनरने जाळलं… : अंगावर शहारे आणणारं वडिलांचं कृत्य

मात्र पीडितेने घडलेलाल संपूर्ण प्रकार तिच्या मामाला सांगितला. मामा आणि तिच्या नातेवाईकांनी पीडितेसोबत सेनगाव पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हेगार वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांनी गुन्हेगार पित्याविरुद्ध पोक्सो कायदा आणि इतर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सेनगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT