Nalasopara Crime : बापच झाला सैतान! मुलीवर आधी बलात्कार, नंतर केलं असं काही की जीवच गेला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Father rapes daughter in Nalasopara Mumbai then forcibly aborts her
Father rapes daughter in Nalasopara Mumbai then forcibly aborts her
social share
google news

Mumbai Crime : मुंबईजवळ असलेल्या पालघर जिल्ह्यातील नालासोपारामध्ये (Nalasopara) एक धक्कादाय घटना घडली आहे. ही घटना पोलिसात गेली तेव्हा पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. येथील एका बापाने आपल्याच मुलीवर बलात्कार (Father rapes daughter) केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी जेव्हा वडिलांना हे घृणास्पद कृत्य करण्यास विरोध करत होती. तेव्हा तिला जबर मारहाण करण्यात येत होती. या घटनेतील पीडितेला टीबी होता अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणातील बापाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

मुलीला झाला होता टीबी

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, 22 वर्षाची पीडित तरुणी नालासोपारा परिसरात तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती. मात्र तिला गेल्या तीन महिन्यांपासून तिला टीबीचा त्रास सुरु असून तिच्यावर उपचारही सुरु आहेत. ही घटना घडल्यानंतर मुलीला 11 नोव्हेंबर रोजी मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या घटनेची माहिती उघड झाल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितले की, तिच्या 54 वर्षाच्या पतीने आपल्याच मुलीवर बलात्कार करुन तिचा शारीरिक छळही करण्यात आला होता.

हे ही वाचा >>Heinous crime : बलात्कार करून दातांनी तोडले शरीराचे लचके अन् प्रायव्हेट पार्टमध्ये…

बापाकडून जीवे मारण्याची धमकी

मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाने मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. मुलगी या प्रकारास विरोध करत होती, त्यामुळे तिला जबर मारहाणही करण्यात आली होती. या घटनेनंतर पीडित मुलगी गरोदरही राहिली होती, त्यामुळे नराधम बापाने तिला जबरदस्तीने गर्भपातही करण्यास सांगितला होता. तर त्यानंतर पीडित मुलीला नंतर टीबीची लागण झाली. त्यामुळे तिला घरात वाईट वागणून देण्यात येत होती.

हे वाचलं का?

मारहाणीत गंभीर इजा

तिला मारहाण करुन गंभीर इजाही करण्यात आली होती. मात्र नंतर टीबीचा अतित्रास झाल्यानंतर तिला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. मात्र आता मुलीच्या आईन वडिलांनी केलेल्या मारहाणीतच मुलीचा मृत्यू झाल्याचे मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हे ही वाचा >> Ratnagiri : ऐकावं ते नवलंच! व्हेल माशाच्या पिलाचा मानसिक तणावामुळे मृत्यू

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT