OYO मध्ये 4 मित्रांसोबत गेला नंतर छतावरून मारावी लागली उडी, भयंकर घटना
ओयो गेस्ट हाऊसमध्ये 23 वर्षीय तरुणाला नशेचे कोल्ड्रिंक देऊन चार जणांनी त्याच्यावर अत्याचार केला. पीडित तरुणाला कोंडून ठेवत चार जणांनी त्याच्यावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केले.
ADVERTISEMENT

Crime News In marathi : चार मित्रांनी OYO हॉटेलला बोलावलं म्हणून तो विश्वास ठेवून गेला. पण, हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासोबत आयुष्यभर विसरता न येणारी घटना घडली. चार मित्रांच्या तावडीतून सुटका करून घेत त्याने छतावरून उडी मारली. पण, तोपर्यंत जे व्हायला नको होतं, ते होऊन गेलं होत.
फरीदाबादमध्ये एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. ओयो हॉटेलमध्ये चार मित्रांनी एका तरुणाला बोलावून नशा मिसळवलेले कोल्ड्रिंक पाजले आणि नंतर त्याच्यावर अत्याचार केले. पीडित तरुणाने त्यांची नजर चुकवून छतावरून उडी मारून आपला जीव वाचवला. बंधक बनवून आरोपींनी पाच हजार रुपये लुटल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे.
पीडित तरुणावर सुरू आहेत उपचार
दिल्लीला लागून असलेल्या हरियाणाच्या फरिदाबादमध्ये एक क्रूर घटना समोर आली आहे. ओयो गेस्ट हाऊसमध्ये 23 वर्षीय तरुणाला नशेचे कोल्ड्रिंक देऊन चार जणांनी त्याच्यावर अत्याचार केला. पीडित तरुणाला कोंडून ठेवत चार जणांनी त्याच्यावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केले.
26 मे रोजी रात्री ही घटना घडली. पीडित तरुणाच्या म्हणण्यानुसार, त्याने OYO च्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव वाचवला आणि पोलिसांत तक्रार केली.