पुण्यात खळबळ! अवघ्या कुटुंबाची आत्महत्या! पती-पत्नीसह मुलांनी घेतलं विष

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे शहरात (Pune City) एक धक्कादायक आणि खळबळ उडवणारी घटना समोर आली. एकाच कुटुंबतील चौघांनी विष प्राशन करत जीवन संपवल्याचा (four members of a family committed suicide) प्रकार घडला. पती-पत्नी आणि दोन तरुण मुलांनी आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास आता पोलीस (Pune Police) करत आहे. (Four members of a family found dead In pune)

ADVERTISEMENT

पुणे शहरातील मुंढवा परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी मृत्यूला कवटाळल्याची घटना शनिवारी घडली. थोटे कुटुंबातील चौघांनी विषारी द्रव्ये प्राशन करत आत्महत्या केल्याची समोर आलं.

दीपक थोटे (वय 59), इंदू दीपक थोटे (वय 45), मुलगा ऋषिकेश दीपक थोटे (वय 24), मुलगी समीक्षा थोटे (वय 17) अशी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील सदस्यांची नावं आहेत. हे कुटुंब दोन महिन्यापूर्वी केशवनगर परिसरात राहण्यास आले होते.

हे वाचलं का?

Rape Case: आधी मॉलला बोलवलं नंतर हॉटेलमध्ये नेऊन केला.., महिलेचा बॉसवर आरोप

थोटे कुटुंब पूर्वी अमरावतीत राहण्यास होते. मुंढवा परिसरातील केशवनगरमध्ये राहण्यास आलेले असताना त्यांनी अचानक टोकाचा निर्णय घेतला.

ADVERTISEMENT

थोटे कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येचं कारण नेमकं समजू शकलं नसलं, तरी काही गोष्टी समोर आल्या आहेत. थोटे कुटुंबाने शेअर मार्केटमध्ये काही पैसे गुंतवलेले होते. मात्र, त्यात प्रचंड नुकसान झाल्यानं थोटे कुटुंबासमोर आर्थिक संकट निर्माण झालं होतं.

ADVERTISEMENT

Thane crime : ‘लिव्ह-इन’चा क्रूर शेवट! प्रेयसीला बोलावून घेतलं अन्…

आर्थिक ओढताण सुरू झाल्यानंतर पती-पत्नीसह दोन्ही मुलांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे म्हटलं जात आहे. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचानामा केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT