Sharad Mohol : घरातून बाहेर पडला पण, मोहोळला दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेताच आलं नाही
शरद मोहोळसोबत असताना मुन्ना नेहमी त्याची हत्या करण्यासाठी पिस्तूल बाळगून असायचा. मात्र ठिकाण आणि मोहोळसोबत असणारी समर्थकांची गर्दीमुळे ते शक्य व्हायचे नाही. त्यात शुक्रवारी शरद मोहोळचा लग्नाचा वाढदिवस होता.
ADVERTISEMENT
Sharad Mohol Murder case : पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा संपूर्ण कट त्याच्याच टोळीत शिजत होता. मात्र त्याला काडीमात्र याची कल्पना नव्हती. या संपूर्ण हत्याकांडाचा मास्टरमाईड 20 वर्षीय मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि मामा उर्फ नामदेव कानगुडे होता. या दोन्ही मास्टरमाईंडने लग्नाच्या वाढदिवशीच त्याचा गेम केला होता. नेमके हे संपूर्ण हत्याकांड कसे घडले आहे? हे जाणून घेऊयात. (sharad mohol murder full story pune ganngwar pune police)
ADVERTISEMENT
मुना उर्फ साहिल पोळेकर यांचा सख्खा मामा नामदेव महिपती कानगुडे आणि मावस मामा विठ्ठल किसन गांडले यांचा शरद मोहोळशी जुना वाद होता. या जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी त्यांनी भाचा मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याच्याद्वारे हत्येचा कट रचला होता. या हत्येसाठी साहिलने चारच महिन्यापूर्वीच पिस्तूल खरेदी केली होती. या पिस्तुलातून गोळीबार करण्याचा त्याने अनेक महिने सराव देखील केला होता. या दरम्यानच मामा नामदेव कानगुडे यांनी त्यांचा शरद मोहोळ टोळीत प्रवेश घडवून आला होता. टोळीत प्रवेश केल्याचे काही दिवसातच तो शरद मोहोळ सोबत फिरायला लागला होता. शरद मोहोळ ज्या ज्या ठिकाणी भेटी द्यायचा, त्या त्या ठिकाणी मुन्ना पोळेकर हजर राहायचा. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच मुन्ना शरद मोहोळच्या जवळ पोहोचला होता.
हे ही वाचा : मुंबईत घातपात घडवण्याचा कट; बोरिवलीतून 6 जणांना अटक, ‘हे’ आरोपी आहेत तरी कोण?
शरद मोहोळसोबत असताना मुन्ना नेहमी त्याची हत्या करण्यासाठी पिस्तूल बाळगून असायचा. मात्र ठिकाण आणि मोहोळसोबत असणारी समर्थकांची गर्दीमुळे ते शक्य व्हायचे नाही. त्यात शुक्रवारी शरद मोहोळचा लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे शरद मोहोळ त्याची घरी गेला आणि दुपारी घरात जेवण केल्यानंतर तो पत्नीसह दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी निघाला होता. या दरम्यान शरद मोहोळच्या सुरक्षेसाठी आरोपी वगळता दोघेच असल्याचे पाहुन मुन्नाने डाव साधला आणि शरद मोहोळ घराबाहेर पडताच त्याच्या छाताडावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. विशेष म्हणजे टोळीत प्रवेश केल्याच्या 25 दिवसातच त्याने शरद मोहोळचा गेम केला होता.
हे वाचलं का?
हे ही वाचा : ‘त्याची अवस्था कुत्र्यासारखी…’, हिंदुस्थानी भाऊची आव्हाडांवर बोचरी टीका
या हत्येनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने, सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली. शरद मोहोळला गोळ्या झाडणारे तीन मारेकरी नामदेव कानगुडे या त्यांच्या आणखी एका साथीदारासह सुतारदरा भागातून पळून गेले. मात्र त्यांचे आणखी चार साथीदार त्यांच्यासाठी एक स्विफ्ट कार आणि एक एक्सव्हीयू गाडी घेऊन हजर होते. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून या 8 जणांनी साताऱ्याच्या दिशेने वाहनातून पळून जायचे ठरवले होते. मात्र पोलिसांनी त्यांच्या गाड्यांचे नंबर ट्रेस करुन त्यांचा पाठलाग करून शिरवळ हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते. आता अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सहा आरोपींना 10 जानेवारीपर्यंत आणि दोन वकिलांना 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT