Gorakhpur Crime: भयंकर.. तरुणीने बॉयफ्रेंडच्या आईला पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, कारण…
Crime News: एका तरुणीने बॉयफ्रेंडच्या आईला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये घडली आहे. जाणून घ्या त्याविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT
Crime News in Marathi: गोरखपूर : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका प्रेयसीने (Girlfriend) प्रियकराच्या (Boyfriend) आईला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, ज्यामध्ये आईचा दुर्देवीरित्या मृत्यू (Murder) झाला. प्रियकराशी लग्न करण्यासाठी प्रेयसी प्रयत्नशील होती. पण अचानक प्रियकर हा मुंबईला पळून गेला. ज्याचा प्रचंड राग आल्याने प्रेयसीने प्रियकराच्या आईलाच जिवंत जाळून टाकलं.
ADVERTISEMENT
लग्न न झाल्यामुळे प्रेयसीला आला राग
गोरखपूरच्या कॅम्पियरगंजच्या गोपलापूरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचे त्याच गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्या मुलीला तिच्या प्रियकराशी लग्न करायचे होते. मात्र प्रियकराला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. त्यामुळे संधी मिळताच तो मुंबईला पळून गेला. प्रियकर मुंबईला पळून गेल्याने संतापलेली प्रेयसी 21 दिवसांआधी म्हणजेच 13 मे रोजी थेट प्रियकराच्या घरी गेली. तिने प्रियकराच्या आईला तिथेच राहू द्यावं यासाठी हट्ट धरला.
हे ही वाचा >> ‘कानाखालीच आवाज काढेन’, अजित पवार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर भडकले
पण आपला मुलगा घरी नसल्याचं कारण देत प्रियकराच्या आईने तिला जाण्यास सांगितलं. ज्यावरुन दोघींमध्ये बराच वादही झाली. त्यावेली प्रेयसीने अचानक प्रियकराच्या आईवर पेट्रोल ओतलं आणि तिला पेटवून दिलं. ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. अखेर गुरुवारी रात्री बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रेयसीला तात्काळ अटक केली.
हे वाचलं का?
प्रियकराच्या आईला पेट्रोल ओतून जिवंत जाळलं
गोरखपूरचे एसपी दक्षिण एके सिंह यांनी सांगितले की, 13 मे रोजी कॅम्पियरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात एका तरुणीने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर पेट्रोल ओतून तिला आग लावली. जखमी महिलेल्या तिच्या काही नातेवाइकांनी उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. पण 1 जून रोजी महिलेचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला.
हे ही वाचा >> Odisha Train Accident: तीन रेल्वे गाड्यांच्या अपघातात ड्रायव्हरचे काय झाले?
मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून कॅम्पीरगंज पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या युवतीला अटक करून न्यायालयात हजर केले. जिथून तिची रवानगी ही आता तुरुंगात करण्यात आली आहे. या महिलेने मृत्यूपूर्वी न्यायदंडाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. त्याआधारे सापडलेल्या पुराव्यांवर चर्चा करून तपास करून पुढील कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT