प्रेमाच्या त्रिकोणात रक्ताचा सडा! चाकूने भोसकून मित्राच्या शरीराची केली चाळण
गेल्या काही वर्षापासून दोघांची चांगली मैत्री मात्र दोघंही एकाच मुलीच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या दोस्तीला दृष्ट लागली. दोघांचाही जीव एकाच मुलीवर जडला आणि वादाची ठिणगी पडली. त्यातील वेदांतने स्वप्नीलला बोलवून घेतले, आणि त्याचा काटा काढला. मित्राला कारमध्येच संपवून तिच कार घेऊन वेदांत पोलिसात दाखल झाला.
ADVERTISEMENT
Murder Case: गुजरातमधील अहमदाबादमध्ये (Ahmedabad, Gujarat) एका तरुणीच्या प्रेमासाठी 22 वर्षाच्या युवकाची निर्घृणपणे हत्या (murder) करण्यात आली आहे. ही हत्या त्याच्याच जवळच्या मित्राने केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मित्राचा मृतदेह (dead body) घेऊन तो त्याचा मित्रा पोलिसात आला होता असंही पोलिसांनीही सांगितले. एका मुलीवरुन दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात आले.
ADVERTISEMENT
मित्राचं अजब धाडस
एका मुलीच्या प्रेमाप्रकरणात दोघां मित्रांमध्ये वाद होऊन ही हत्या करण्यात आली आहे. दोघं मित्र एकाच कारमधून एकाच मुलीवरून वाद घालत होते. त्यानंतर त्याच कारमध्ये मित्राला चाकूने भोसकून हत्या केली, त्यानंतर रक्ताने माखलेला मित्राचा मृतदेह घेऊन आरोपीने कार थेट पोलिसात घेऊन गेला. पोलिसांनी ही घटना पाहिल्यानंतर मृत मुलाच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देऊन त्यांनी त्यांनी पोलिसात बोलवून घेतले. मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा >>‘दादा’ म्हणत होते पोलिसांची जमीन बिल्डरला द्या, मी म्हणाले देणार नाही; मीरा बोरवणकरांचा गौप्यस्फोट
कुटुंबीय अंधारात
या खळबळजनक घटनेने अहमदाबाद हादरले आहे. ज्या मित्राची हत्या करण्यात आली आहे. त्याचे नाव स्वप्नील प्रजापती असं त्या तरुणाचे नाव आहे. तर वेदांत असं हत्या करणाऱ्या मित्राचे नाव आहे. वेदांत आणि एका मुलीचे प्रेमसंबंध होते. त्याची माहिती स्वप्नील प्रजापतीलाही होती. मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून स्वप्नील कधी तरीच घरी येत होता. 14 ऑक्टोबर रोजी मात्र दुपारी 2 वाजता स्वप्नील घरी आला होता.
हे वाचलं का?
रक्ताने माखली कार
त्यानंतर तो घरी न सांगताच तो बाहेर निघून गेला होता. त्याच दिवशी स्वप्नीलला रात्री आठ वाजता फोन केला होता, मात्र तो काही बोलला नाही. त्या रात्री पुन्हा त्याच्या बरोबर कुटुंबीयांनी काही संवाद साधला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी स्वप्नीलच्या घरी जात त्याच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलवून आणण्यात आले. त्यावेळी स्वप्नीलचा रक्तात माखलेला मृतदेह कारमध्ये दिसून आला.
प्रेमासाठी मित्राचा विसर
कारमध्ये पडलेला मृतदेह स्वप्नीलाच्या वडिलांना दाखवल्यानंतर त्यांनी तो ओळखला. त्यानंतर पोलिसांनी स्वप्नीलचा मित्र वेदांतने हा मृतदेह सकाळीच पोलिसात आणला आहे. त्यावेळी पोलिसांनी त्यांना सांगितले की, वेदांत आणि स्वप्नीलचे एका मुलीच्या प्रकरणावरुन वाद झाले होते. त्या वादामुळे वेदांतने स्वप्नीलवर चाकून वार करुन त्याला ठार केले, व सकाळी तोच मृतदेह घेऊन वेदांत पोलिसात घेऊन आला.
ADVERTISEMENT
घरातील शेंडेफळ
आपल्या मुलाची हत्या झाल्याचे कळताच स्वप्नीलच्या वडिलांनी वेदांतविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला. स्वप्नील हा दोन महिन्यापूर्वी एका लॅबमध्ये काम करत होता. मात्र सध्या चो घरीच बसून होता.त्याला एक भाऊ असून स्वप्नील हा सगळ्यात लहान होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Samruddhi Mahamarg Accident : ‘समृद्धी’वर पुन्हा अपघात! नाशिकचे 12 भाविक ठार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT