Crime : भयंकर…एकाच कुटुंबातील 7 जणांची सामूहिक आत्महत्या

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

gujarat mass suicide surat seven people of a family committed mass suicide shocking story
gujarat mass suicide surat seven people of a family committed mass suicide shocking story
social share
google news

Gujarat Mass Suicide : गुजरातच्या (Gujrat) सूरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील 7 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या घटनेत तीन चिमुकल्यांचा समावेश आहे, आर्थिक विवंचनेतून कुटुंबियांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून तपास सूरू केला आहे. या घटनेने गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. (gujarat mass suicide surat seven people of a family committed mass suicide shocking story )

सूरतच्या अडाजण परीसरात राहणाऱ्या सोलंकी कुटुंबियाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली. सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सिद्धेश्वर अपार्टमेंटच्या पहिल्या माळ्यावर कनुभाई सोलंकी आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. कनुभाई यांचा मुलगा मनीष उर्फ शांतु सोलंकीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. तर कनुभाईची पत्नी शोभनाबेन, मनीषची पत्नी रीटा, मनीषची 10 आणि 13 वर्षाच्या दिशा आणि काव्या या दोन मुली आणि छोटा मुलगा कुशलचा मृतदेह बिछान्यात पडला होता.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरूवात केली आहे. तसेच पोलिसांनी सातही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवले आहेत. या पोस्टमार्टम रिपोर्टमधून आता कुटुंबियांच्या आत्महत्ये मागचं खरं कारण समोर येणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Sharad Pawar : PM मोदींच्या टीकेवर पवारांचा पलटवार, कृषीमंत्री असतानाची आकडेवारी देत प्रत्युत्तर

सामूहिक आत्महत्या करणारे हे कुटुंब फर्निचरचा व्यवसाय करायचं. त्यात प्राथमिक माहितीनूसार कुटुंबिय आर्थिक विवंचनेचा सामना करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे फर्निचर व्यवसायातील तोट्यामुळे कुटुंबियांनी टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मात्र पोलिसांच्या तपासानंतर या सामूहिक आत्महत्ये मागचं कारण समोर येणार आहे.

सूरतमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केली आहे.घटनास्थळी आम्हाला एक सुसाईड नोटही सापडली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच या घटनेचा तपास पोलीस करीत आहे,अशी माहिती पोलीस उपायुक्त राकेश बारोट यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये नेमका काय मजकूर लिहला आहे तो अद्याप समोर आला नाही आहे. मात्र या सुसाईड नोटने सात जणांच्या आत्महत्येची गुढ उकलणार आहे. या घटनेने सध्या गुजरात हादरलं आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maratha Reservation : ‘उपोषणादरम्यान जीवाला धोका निर्माण झाल्यास…’, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT