Crime : पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय, पतीनं केलं अत्यंत भयंकर कृत्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

husband killed his wife badalapur thane crime story
husband killed his wife badalapur thane crime story
social share
google news

ठाण्यात (Thane) एका पतीने गळा दाबून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयातून पती-पत्नीमध्ये (Husband-Wife) अनेकदा घरगुती वाद व्हायचे. याच वादातून संतप्त होऊन पतीने बायकोची गळा दाबून हत्या केली आहे. या हत्येनंतर आरोपी पतीने बायकोच्या भावाला फोन करून या हत्येची माहिती दिली होती. यानंतर भावाने पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी नवऱ्याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. (husband killed his wife badalapur thane crime story)

ADVERTISEMENT

बदलापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 42 वर्षीय पती आणि त्याची 37 वर्षीय पत्नी दोघेही एकत्र राहत होते. या दोघांमध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे व्हायचे. रविवारी अशीच पती-पत्नीमध्ये भांडणे झाली. या भांडणाच्या रागातून पतीने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. खरं तर घऱगुती वाद आणि चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये नेहमीच खटके उडायचे. या वादातून आरोपीने पत्नीची हत्या केली आहे. या हत्येनंतर आरोपीने पत्नीच्या भावाला फोन करून हत्येची माहिती दिली. या हत्येनंतर भावाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

हे ही वाचा : Dombivli Crime: भयंकर… चाकू हातात घेत मित्राचा पाठलाग, हत्येचं कारण काय?

भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी घटनास्थळी पत्नी घरच्या पलंगावर मृत अवस्थेत सापडली होती.पोलिसांनी घटनास्थळाचा तपास करत महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आता या पोस्टमार्टम रीपोर्टमधून हत्येचे कारण समोर येणार आहे.या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

हे वाचलं का?

दरम्यान याआधी दौड तालूक्यात पेशाने डॉक्टर असलेल्या अतूल दिवेकर यांनी संपूर्ण कुटुंब संपवल्याची घटना घडली होती. अतूल दिवेकर यांनी शिक्षिका पत्नी पल्लवी दिवेकर हिची गळा दाबून हत्या केली होती. तसेच स्वत: देखील गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर घरातून काहीच हालचाल होत नसल्याचा पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. यानंतर घरचा दरवाजा उघडताच पोलिसांना धक्का बसला. पती-पत्नी शेजारी सुसाईड नोटही सापडली होती. या नोटमध्ये पत्नीने दोन मुलांना विहरीत टाकल्याचीही माहिती दिली होती. या घटनेत संपूर्ण शहर हादरले होते.

हे ही वाचा : धक्कादायक! मित्रानेच चिरला मित्राचाच गळा, अन् हैवानासारखा रक्तही प्यायला!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT