नववधू हादरली… Honeymoon च्या रात्री व्हायग्रा घेऊन पतीकडून अनैसर्गिक संबंध

ADVERTISEMENT

husband unnatural sex with bride after taking viagra on wedding night wife reached police for help
husband unnatural sex with bride after taking viagra on wedding night wife reached police for help
social share
google news

Crime News: देहरादून: देहरादून (Deharadun) उत्तराखंडमधील देहरादूनमध्ये नुकतेच एका नवविवाहित जोडप्याशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नववधू तिच्यासोबत लग्नाच्या पहिल्याच रात्री जो प्रकार घडला त्याप्रकरणी थेट पोलिसातच धाव घेतली. यावेळी तिने पोलीस अधिकार्‍यांना सांगितले की, तिच्या पतीने लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी लग्नाच्या रात्री कामोत्तेजक औषध व्हायग्रा (Viagra) घेतले होते. ज्यानंतर त्याने नववधूसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंधही (unnatural sex) प्रस्थापित केले. पतीच्या या कृत्याने हादरून गेलेल्या महिलेने थेट याप्रकरणी पत्नीने पोलिसांत तक्रार केली. ज्यामध्ये तिने पती आणि सासरच्या मंडळींवर जबरदस्ती शारीरिक संबंधच आणि हुंडयासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. (husband unnatural sex with bride after taking viagra on wedding night wife reached police for help)

नेमकं प्रकरण काय?

देहरादून कोतवाली भागात जोडप्याच्या लग्नाच्या पहिल्या रात्री ही घटना घडली. पीडितेच्या पतीवर आता पत्नीच्या तक्रारीच्या आधारे अनैसर्गिक लैंगिक संबंधाच्या भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकार्‍यांना दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले की, तिने 7 फेब्रुवारी 2023 रोजी डेहराडूनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीशी लग्न केले होते. लग्नाच्या रात्री लैंगिक क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने औषध सेवन केल्यावर तिने तिच्या पतीवर संमतीविना लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप केला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Crime: वासनांध पत्नी, प्रियकर अन् पतीच्याच पैशाने… हादरवून टाकणारी घटना

पीडितेने पुढे असा दावा केला की, ती काही दिवसांसाठी तिच्या माहेरी परतली आणि नंतर सासरी परतल्यावर पतीने तिच्या इच्छेविरुद्ध सहमती नसताना शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढंच नव्हे तर त्याने यावेळीही अनैसर्गिक संबंधही ठेवले. दरम्यान, तिने विरोध केल्यानंतरही पतीने शारीरिक अत्याचार करून तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप पत्नीने केला आहे.

आपल्या कुटुंबीयांना कोणताही त्रास होऊ नये या प्रयत्नात महिलेने हा संपूर्ण प्रकार बराच काळ सहन केला. मात्र, परिस्थिती असह्य झाल्याने ती अस्वस्थ झाली आणि लग्नानंतर अवघ्या 20 दिवसांनी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी तिने मनगट कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परिस्थितीचे गांभीर्य समजून तिच्या पतीने तिला रुग्णालयात दाखल केले होते जिथे तिचा जीव वाचला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Love, Sex आणि… ‘शरीराच्या प्रत्येक भागावर त्याने..’ Facbook मित्रासोबतची ‘ती’ रात्र!

पीडित महिलेने आता आरोपी पतीविरुद्ध अनैसर्गिक सेक्ससह विविध कलमांखाली तक्रार दाखल केली आहे. यासोबतच पती आणि सासरच्या मंडळींवर हुंडा आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT