“तू काळा आहेस आणि मी गोरी”, पत्नीने चक्क पतीलाच जिवंत जाळलं!
नवरा काळा होता म्हणून सातत्याने त्याला त्याच्या रंगावरून टोमणे मारणे, त्याला चिडवत राहण्याचा प्रकार त्याच्या बायकोकडून केले जात होते. त्यानंतर पती एकदा झोपला असतानाच त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळल्याप्रकरणी आता न्यायालयाकडून तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

Husband Murder : काही दिवसांपूर्वी संभल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली होती. पती-पत्नीचा वाद (husband- wife Dispute) झाल्यानंतर पत्नीने पतीला जिवंत जाळल्याची (Burned husband) धक्कादायक घटना घडली होती. त्या प्रकरणी आता न्यायालयाने पत्नीला दोषी ठरवून तिला जन्मठेपेची शिक्षा (life-imprisonment) सुनावण्यात आली आहे. त्याच बरोबर पत्नीला 25 हजारचा दंडही ठोठवण्यात आला आहे. पतीचा रंग काळा (Black) असल्याने पत्नीने नवऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळले होते. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ महिलेला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने आरोपी पत्नीला शिक्षा सुनावल्यानंतर आता मृताच्या भावाने न्यायालयाचे आभार मानले आहेत.
भावाला जिवंत जाळलं
कुढफतेहगडमध्ये 2019 मध्ये बिचैटा गावात राहणाऱ्या सत्यवीर सिंह (वय 25) यांना त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळून टाकण्यात आले होते. त्यानंतर मृत सत्यवीर सिंहच्या पत्नीवर संशय व्यक्त करत तिनेच आपल्या भावाला जळाले असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पत्नीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सावळ्या रंगावरुन टोकाची भांडणं
सत्यवीरला जिवंत जाळल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनीही पत्नीवर गंभीर आरोप केले होते. सत्यवीरच्या लग्नानंतर प्रेमश्रीकडून सत्यवीरचा सावळा रंग असल्या कारणामुळे त्याच्यावर ती सारखे टोमणे मारत होती. त्याला त्याच्या रंगावरून चिडवत राहण्याचा प्रकार ती करत होती. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास करण्यात आला. त्यानंतर संभल जिल्ह्यातील चंदौसी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. त्यानंतर मृत सत्यवीरच्या कुटुंबीयांनी न्यायालयात आपली बाजू मांडून सत्यता समोर आणण्याचा प्रयत्न केला होता.
हे ही वाचा >> Maratha Reservation : शंभूराज देसाई छगन भुजबळांवर संतापले, ”मोठेपणा घेण्यासाठी…”
हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
या प्रकरणी 4 वर्षानंतर या प्रकरणाची पुन्हा सुनावणी सुरु झाली होती. त्यामुळे सोमवारी संभल जिल्ह्यातील सत्र न्यायाधीशाने मृत सत्यवीरच्या पत्नीला हत्या केल्या प्रकरणी दोषी ठरवून तिला शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायाधीश अशोक कुमार यादव यांनी मृत सत्यवीर सिंगची पत्नी प्रेमश्री हिला नवऱ्याच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याच महिलेला 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.