डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटी राहणाऱ्या पतीने बायकोचे अश्लील व्हिडीओ केले व्हायरल
Dombivli Crime: कौटुंबिक वादातून डोंबिवलीत राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीचेच अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ADVERTISEMENT
Husband made wife obscene videos viral on social media: डोंबिवली: कौटुंबिक हिंसाचार (Domestic violence) कुठले टोक गाठेल याचा सध्याच्या परिस्थीती काही नेम नाही. असाच एक वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. पती-पत्नीच्या वादातून पतीने पत्नीचा तयार केलेला अश्लील व्हिडीओ (obscene video) सोशल मीडियावर टाकत बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीसारख्या (Dombivli) सुसंस्कृत शहरात घडला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी पतीसह त्याच्या नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (husband who lives in an elite society in dombivli made his wifes obscene videos viral on social media)
डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये पीडित महिला आपल्या पतीसोबत राहत होती. जून 2020 आली या दोघांचे लग्न झाले होते. पण गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. याच दरम्यान पीडित महिलेचे पतीने अश्लील व्हिडीओ काढले व हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. याचा जाब विचारला असता पीडित महिलेला पतीने मारहाण केली.
दरम्यान, आपला पती भिवंडीतील एका तरुणीशी दुसरे लग्न करणार असल्याची माहिती पीडित महिलेला मिळाली. या संदर्भात विचारणा केली असता पतीसह त्याच्या कुटुंबाने पीडित महिलेला शिवीगाळ करत धमकावले. या प्रकरणी पीडीत महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी पतीसह त्याच्या नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पीडित महिलेने पोलीस तक्रारीत केले गंभीर आरोप
पीडित विवाहितेने या संदर्भात सविस्तर माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे जबाब नोंदवून पोलिसांनी आरोपी पती महेश पाटील (27) सह अन्य 5 जणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. आरोपी महेश याचे यापूर्वीही लग्न झाले होते. पहिल्या पत्नीशी फारकत घेतल्यानंतर त्याने आपल्याशी लग्न केले. एके रात्री त्याने त्याच्या मोबाइलमध्ये समागमाचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ त्याने 10 मार्च रोजी व्हायरल केला.
या व्हिडीओखाली समाजात बदनामी होईल असा मजकूरही टाकला. जाब विचारला असता आपणास मारहाणही करण्यात आली. पोलिसात तक्रार दिल्यास परिणाम वाईट होतील, अशीही आपणास धमकी दिल्याचे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.
ADVERTISEMENT
आपल्याशी लग्न झालेले असतानाही भिवंडीतील एका तरुणीशी गुपचुप साखरपुडा करून लग्नाची तारीख देखील पतीने ठरवली होती. याबाबत सासऱ्यांना जाब विचारला असता त्यांनीही आपणास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. 6 एप्रिल रोजी मैत्रिणीसह घरी असताना पतीचे नातेवाईक आले. त्यांनी देखील आपणास शिवीगाळ केली. तसेच तू जर महेशला सोडले नाही आणि त्याच्या लग्नात आडवी आलीस तर तुला जिवंत ठेवणार नाही. तुझे आई, वडील, भाऊ, बहिणीसह सर्व नातेवाईकांना संपवून टाकू, अशी धमकी दिल्याचे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत नमूद केले आहे. आता पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT