लिव्ह-इन पार्टनरकडून 23 वर्षीय तरुणीची चाकूने भोकसून हत्या, बॉडी गोणीत भरली अन्..
Hyderabad Crime News : लग्न करण्यावरून झालेल्या वादानंतर हैदराबादमध्ये 23 वर्षीय तरुणीची तिच्या लिव्ह-इन पार्टनरने चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडली. हत्येनंतर मृतदेह गोणीत भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला असून आरोपी फरार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लिव्ह-इन पार्टनरकडून 23 वर्षीय तरुणीची चाकूने भोकसून हत्या
बॉडी गोणीत भरली अन्..
Hyderabad Crime News : हैदराबादमध्ये लग्न करण्यावरून झालेल्या वादातून 23 वर्षीय तरुणीची तिच्या लिव्ह-इन पार्टनरने चाकूने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. हत्येनंतर आरोपीने मृतदेह गोणीत भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. आरोपी मजूर म्हणून काम करत असून सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.
हेही वाचा : बॉयफ्रेंडने बर्थडेच्या बहाण्याने बोलावलं, पार्टी केली अन् मित्रांसमवेत गर्लफ्रेंडवर बलात्कार
एक वर्षापासून तिचे आरोपीसोबत संबंध
प्राथमिक तपासानुसार, मृत तरुणी मूळची बिहारची रहिवासी होती. गेल्या सुमारे एक वर्षापासून तिचे आरोपीसोबत संबंध होते. मागील दोन महिन्यांपासून ती आरोपीच्या घरी राहत होती. रविवारी रात्री या दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून वाद झाला. तरुणीने आरोपीकडे लग्न करण्याची मागणी केली होती. मात्र, आरोपीने लग्नास नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये वाद वाढला आणि आरोपीने चाकूने तिच्यावर हल्ला केला.
हेही वाचा : 11 वर्षाच्या मुलीवर सावत्र बापाकडून अत्याचार, मुलीनं व्हिडिओ बनवत पितळ उघडं पाडलं
