बॉयफ्रेंडने बर्थडेच्या बहाण्याने बोलावलं, पार्टी केली अन् मित्रांसमवेत गर्लफ्रेंडवर बलात्कार

मुंबई तक

lakhimpur kheri gang rape case : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे 15 ऑगस्ट रोजी तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी बॉयफ्रेंडसह तिघांना 24 तासांत अटक केली.

ADVERTISEMENT

lakhimpur kheri gang rape case
lakhimpur lakhimpur kheri gang rape casekheri gang rape case
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बॉयफ्रेंडने बर्थडेच्या बहाण्याने बोलावलं,

point

पार्टी केली अन् मित्रांसमवेत गर्लफ्रेंडवर बलात्कार

lakhimpur kheri gang rape case : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमध्ये 15 ऑगस्ट रोजी एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. सीतापूर येथे राहणारी पीडिता लखीमपूरमध्ये आपल्या आजीकडे आली होती. तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ श्रीवास्तव याने वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला आपल्या घरी बोलावले होते. त्याच्या घरी सिद्धार्थचे दोन मित्र मधुरेश मिश्रा आणि विष्णू कनौजिया हे देखील उपस्थित होते. तिघांनी आधी केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर तिघांनी मिळून तरुणीवर बारी-बारीने बलात्कार केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : दोन बॉयफ्रेंड, तरुणी झाली प्रेग्नंट, बाळाचा बाप कोण? DNA चाचणीतून होणार खुलासा

केक कापल्यानंतर तिघांनी केला तरुणीवर बलात्कार 

केक कापल्यानंतर तिघांनी तरुणीला खोलीत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. घटनेनंतर आरोपींनी तरुणीला जखमी अवस्थेत खोलीत सोडून घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर तरुणीने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

हेही वाचा : महिलेचे पतीच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, सहा वर्षांच्या लेकराला संपवलं