Crime : गन पॉईंटवर केलं नग्न, बलात्कार करून…, विद्यार्थीनींसोबत काय घडलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

iit bhu gang rape case three accused arrested after 60 days incident shocking crime story from uttar pradesh
iit bhu gang rape case three accused arrested after 60 days incident shocking crime story from uttar pradesh
social share
google news

IIT BHU Gang Rape Case : उत्तरप्रदेशच्या बनारस हिंदु युनिवर्सिटीतील काही विद्यार्थीनींसोबत छेडछाड आणि बलात्काराची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत काही तरूणांनी बुलेटवरून विद्यार्थीनींचा पाठलाग करून त्यांना गनपॉईंटवर नग्न करून त्यांच्यावर बलात्कार केला होता. या घटनेचा बनारस हिंदु युनिवर्सिटीतील विद्यार्थ्यांनी जोरदार निषेध करत विद्यार्थीनींच्या सुरक्षेची मागणी केली होती. आता या प्रकरणात तब्बल 60 दिवसांनी आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कुणाल पांडे, अभिषेत चौहान आणि सक्षम पटेल असे या तीन आरोपींची नाव आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे. (iit bhu gang rape case three accused arrested after 60 days incident shocking crime story from uttar pradesh)

बनारस हिंदु युनिवर्सिटीत 2 नोव्हेंबरला ही घटना घडली होती. या घटनेत आय़आयटीच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या काही विद्यार्थीनी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास वस्तीगृहाबाहेर व़ॉकसाठी् निघाल्या होत्या. या दरम्यान वाटेतच बुलेट बाईकवरून आलेल्या तीन अनोळखी तरुणांनी त्यांचा पाठलाग करायला सुरूवात केली. अगदी कॅम्पसमध्य़े देखील हे तरूण दाखल झाले. यावेळी त्यांनी आत शिरून तीनही मुलींना वेगळे केलं आणि नंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला.

हे ही वाचा : NCP : “जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता”, शिंदेंच्या नेत्याचं स्फोटक दावा

पीडीत विद्यार्थीनींनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला एकएकटीला बाजूला नेऊन धमकावलेच नाही तर त्यांनी आम्हाला जबरदस्ती कपडे काढण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी जबरदस्तीने आमचे चुंबनही घेतले. आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आमचा अश्लील व्हिडिओही बनवला आणि आमचा मोबाईल नंबरही घेतला. या घटनेनंतर हे तीनही आरोपी फरार झाले होते. तसेच युनिवर्सीटीतील विद्यार्थीनींसोबत झालेल्या या घटनेचा विद्यार्थ्यांनी जोरदार निषेध केला आणि सुरक्षेची मागणी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान पीडीत विद्यार्थीनींच्या तक्रारीवरून आता लंका पोलिसांनी आयपीसी, 506 आणि 66 आयटी कायद्याच्या कलम 354 (बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर युनिवर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करून निषेध नोंदवल्यानंतर पोलिसांनी सामूहिक बलात्कार (IPC 376-D) आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे लैंगिक छळ (IPC 509) संबंधित कलमांमध्ये वाढ केली होती.

हे ही वाचा : Devendra Fadnavis : “भावी खासदार पोस्टर लावणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम”, फडणवीसांचा इशारा

पीडितेच्या जबाबावरून आता हे दोन्ही कलम वाढवण्यात आले आहे. पोलिसांशिवाय विद्यार्थ्याचे लेखी जबाबही दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनीने पोलिसांकडे तिचे जबाब नोंदवले आहेत की, आरोपीने तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला होता. तसेच तिला जबरदस्तीने विवस्त्र करून व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली होती.

ADVERTISEMENT

आता या प्रकरणात तब्बल 60 दिवसांनी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. कुणाल पांडे, अभिषेत चौहान आणि सक्षम पटेल असे या तीन आरोपींची नाव आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT