Crime: पोलीस पत्नीच्या गळ्यावरुन फिरवला चाकू, 2 वर्षाच्या चिमुकलीनेही रक्ताच्या थारोळ्यात सोडला जीव

मुंबई तक

ADVERTISEMENT

in buldhana brutally killing a police wife and his 2 year old daughter after a farmer husband also committed suicide crime news
in buldhana brutally killing a police wife and his 2 year old daughter after a farmer husband also committed suicide crime news
social share
google news

जका खान, बुलढाणा: बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात आज एका महिला पोलीस कॉन्स्टेबल (Lady Police) आणि तिच्या निष्पाप मुलीची धारदार शस्त्राने हत्या (Murder) केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ही हत्या महिलेच्या शेतकरी पतीनेच केली असल्याचं समोर आलं आहे. ज्यानंतर त्याने स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने बुलढाणा पोलिसातही खळबळ माजली आहे. (in buldhana brutally killing a police wife and his 2 year old daughter after a farmer husband also committed suicide crime news)

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

जिल्ह्यातील चिखली शहरात आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास पंचमुखी महादेव मंदिर परिसरात असलेल्या घरात चिखली पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी आणि तिच्या 2 वर्षाच्या निष्पाप मुलीची पोटात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.

हे ही वाचा >> Sana Khan Murder : सना, सेक्स्टॉर्शन आणि ग्राहकांसोबत संबंध; पोलिसांच्या हाती स्फोटक माहिती

मारेकरी पती किशोर कुटे याने आपली महिला पोलीस अधिकारी पत्नी वर्षा कुटे (दंडले) आणि 2 वर्षांच्या निष्पाप मुलीची हत्या करून चिखली शहरापासून 15 किमी अंतरावर शेतातील विहिरित गळफास लावून आत्महत्या केली. हत्याकांडाच्या वेळी 8 वर्षांची दुसरी मुलगी शाळेत गेली होती त्यामुळे सुदैवाने ती वाचली आहे.

हे वाचलं का?

मृत महिला पोलीस पत्नी वर्षा कुटे

 

हत्येच नेमकं कारण काय?

या संपूर्ण हृदयद्रावक घटनेमुळे पोलीस प्रशासनाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी महिला आणि तिची मुलगी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. त्यानंतर महिलेच्या पती हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र, पतीने दोघींची इतक्या निर्घृणपणे हत्या का केली? याचं कारण अद्यापही पोलिसांना समजू शकलेलं नाही. तसंच आत्महत्या करण्यापूर्वी पतीने कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट देखील लिहलेली नाही. त्यामुळे हे हत्याकांड का घडलं याविषयी अद्यापही संभ्रम कायम आहे. सध्या पोलीस या हत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> loco pilot suicide : … आणि लोको पायलटने आयुष्यच संपवलं, कल्याणमधील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, मारेकरी पती किशोर आणि त्याच्या पत्नीचे संबंध अत्यंत चांगले असल्याचे त्यांच्या परिसरातील लोकांनी सांगितले, मात्र ही हत्या का? करण्यात आली, याबाबत सर्वच संभ्रमात आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT