मुलाला सोडवायला गेलेल्या बापाचा पोलीस ठाण्यात मृत्यू, CID चौकशीचे आदेश
A man who went to rescue his son died at police station: कल्याण: कल्याणच्या (Kalyan) कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दीपक भिंगारदिवे या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने येथील वातावरण चांगलंच तापलं आहे. पोलीस ठाण्यात (Police Station) हा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दीपक यांची पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकारी असून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) […]
ADVERTISEMENT
A man who went to rescue his son died at police station: कल्याण: कल्याणच्या (Kalyan) कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दीपक भिंगारदिवे या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने येथील वातावरण चांगलंच तापलं आहे. पोलीस ठाण्यात (Police Station) हा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दीपक यांची पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकारी असून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या घटनेबाबत ट्विट केलं आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. (in kalyan father who went to rescue child died in police station cid inquiry orders)
ADVERTISEMENT
दरम्यान, पोलिसांनी मारहाण केल्यानेच दीपकचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र पोलिसांनी हे सगळे आरोपी फेटाळले आहेत. याप्रकरणी आता सीआयडी चौकशी केली जाणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात आले. यावेळी प्रितेश भिंगारदिवे या 23 वर्षे तरुणाला कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली. दरम्यान याची माहिती प्रितेशचे वडील दीपक भिंगारदिवे यांना मिळाली, त्यामुळे ते थेट कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गेले आणि तिथे काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला.
हे वाचलं का?
मुलाला सोडवण्या साठी मयत पदाधिकारी गेले असता पोलीस लोकांनी त्याच्या सोबत वाद घालून त्यांना लाथा बुक्यानी पोलीस स्टेशन मध्ये मारहाण केली. त्यात त्यांच्या जागेवर जीव गेला.
आता मयत ची बॉडी रुख्मिणी बाई सरकारी हॉस्पिटल ला पोस्ट मारटम ला आणली आहे.— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 24, 2023
पोलिसांनी दीपक यांना मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप भिंगारदिवे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
ADVERTISEMENT
Nashik Crime: मुंडकं छाटलं, सापडला फक्त धडासह मृतदेह.. थरकाप उडवणारी घटना
ADVERTISEMENT
दुसरीकडे पोलिसांनी दीपक भिंगारदिवे यांच्या मृत्यू प्रकरणी माहिती देताना सांगितलं की, प्रितेश याची चौकशी सुरू असताना दीपक भिंगारदिवे हे मोबाइलमध्ये त्याचे चित्रीकरण करत होते. त्यामुळे त्यांना पोलिसांनी थांबवले आणि अंमलदार कक्षाच्या शेजारी बसवून ठेवले. याच दरम्यान त्यांना फिट आल्यानंतर त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याच्या पोलीस उपायुक्तांनी सांगितले. तसेच भिंगारदिव्यांच्या कुटुंबियांनी केलेले आरोप पोलिसांनी फेटाळून लावले आहेत.
Crime: शिव्या दिल्या अन् जीव गमवला, थरकाप उडवणारी घटना
Nashik Crime: मुंडकं छाटलं, सापडला फक्त धडासह मृतदेह.. थरकाप उडवणारी घटनायासंबंधीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून या प्रकरणी सीआयडी चौकशी करण्यात येणार असल्याचा पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले. मात्र जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा भिंगारदिवे यांच्या कुटुंबाने घेतला आहे.
दीपक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT