Crime : मित्रानेच काढला मित्राचा काटा, पुर्ववैमनस्यातून... इंदापूर हत्याकांडाची Inside Story

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

indapur murder case gangster from pimpri shot dead shocking incident from pune indapur police
अचानक तरूणाच्या मागून एक टोळकी येते आणि अविनाशवर बेछुट गोळीबार करू लागते.
social share
google news

Indapur Murder Case : इंदापूरमधून एक हादरवून टाकणारी हत्येची घटना घडली आहे. हॉटेलमध्ये जेवायला बसलेल्या एका तरूणावर एका टोळीने बेछुट गोळीबार करून व नंतर कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली.अविनाश बाळू धनवे (वय 36) असे या मृत तरूणाचे नाव आहे. या तरूणाच्या हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेने सध्या इंदापूरमध्ये हादरलं आहे. पण इतक्या निर्दयीपणे या तरुणाची हत्या का करण्यात आली? या हत्येमागचं नेमकं कारण काय? हे जाणून घेऊयात.  (indapur murder case gangster from pimpri shot dead shocking incident from pune indapur police) 

मुळचा पिंपरी चिंचवडचा रहिवासी असलेला अविनाश बाळू धनवे त्याच्या मित्रांसह कारने पंढरपूरला निघाला होता. या दरम्यान रात्री 8 च्या सुमारास अविनाश त्याच्या मित्रांसह इंदापूरातील हॉटेल जगदंबमध्ये जेवण करण्यासाठी थांबले होते. या दरम्यान अचानक तरूणाच्या मागून एक टोळकी येते आणि अविनाशवर बेछुट गोळीबार करू लागते. या गोळीबारानंतर तरूणाचा मृत्यू होतो आणि तो जेवणाच्या टेबलावरूनच खाली कोसळतो. मात्र तरूणाच्या मृत्यूनंतरही टोळी काय थांबत नाही, कोयत्याने तरूणावर सपासपा वार करू लागते. या हत्येनंतर आरोपींची टोळी घटनास्थळावरून पसार होते.

हे ही वाचा :  "तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती"

या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षक कोकणे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधिक्षक संजय जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी यावेळी घटनास्थळाची सीसीटीव्ही ताब्यात घेऊन या घटनेच्या तपासाला सुरूवात केली होती. दरम्यान पोलिसांनी आरोपीचा माग काढण्यासाठी दोन पथकेही नेमली होती. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मृत अविनाश धनवे हा मोक्कामधील आरोपी असल्याचं पोलीस तपासात पुढे आले आहे. त्याच्यावर पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. महिन्याभरापूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता. मात्र आता त्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे.  दरम्यान अविनाश या हत्येच्या कटात त्याच्याच सहकाऱ्याचा हात असल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा :  अकलूजच्या 'शिवरत्नवर' खलबतं! मोहिते पाटील काय डाव टाकणार?

अविनाश सोबत हॉटेलमध्ये जो तरूण बसला होता. तो तरूण या टोळीला मार्गदर्शन करत होता. ही टोळी अविनाशच्या गाडीचा पाठलाग करत होती. त्यानंतर हॉटेलमध्ये या टोळीने येऊन अविनाशची हत्या केली होती. दरम्यान आता अविनाशच्या सहकाऱ्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले असून  त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.  

ADVERTISEMENT

दरम्यान या प्रकरणात आता 10 आरोपी सहभागी असल्याचं निष्पण्ण झालं आहे. या सगळ्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धनवेचे काही अवैध धंदे होते का? किंवा ही हत्या कशातून झाली आहे? याचाही तपास पोलीस करीत आहेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT