JSW : “ऑफिसला बोलावलं अन् बलात्कार केला”, उद्योगपती सज्जन जिंदालांवर गुन्हा दाखल

विद्या

ADVERTISEMENT

jsw groups sajjan jindal accused of rape bkc police register fir bombay high court mumbai
jsw groups sajjan jindal accused of rape bkc police register fir bombay high court mumbai
social share
google news

JSW Group Sajjan jindal Accused rape : जेएसडब्ल्यू समूहाचे (JSW Group) व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल (Sajjan jindal) यांच्याविरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 30 वर्षीय पी़डित महिलेने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या आरोपानंतर पीडीत महिलेने तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.मात्र पोलीसांनी तिची तक्रार दाखल करून घेतली नव्हती. त्यामुळे पीडित महिलेने मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतली. यानंतर आता न्यायालयाच्या आदेशाने बीकेसी पोलिसांनी सज्जन जिंदल यांच्याविरोधात बलात्काराला (Rape Case) गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, हे जाणून घेऊयात. (jsw groups sajjan jindal accused of rape bkc police register fir bombay high court mumbai)

पीडीत महिलेने तक्रारीत दिलेल्या माहितीनूसार, 8 ऑक्टोबर 2021 रोजी दुबईत तिची पहिल्यांदा सज्जन जिंदाल यांच्याशी भेट झाली होती. एका आयपीएल सामन्याच्या व्हीआयपी बॉक्समध्ये पीडीत महिला तिच्या भावासोबत जिंदालला भेटली होती. पीडीतेचा भाऊ हा मालमत्ता सल्लागार होता आणि जिंदाल यांना तिच्या भावाकडून मालमत्ता खरेदी करण्यात रस असल्याने ही भेट झाली होती. या भेटी दरम्यान दोघांनी नंबर्सची देवाणघेवाण केली होती.

हे ही वाचा : Solar Explosive Company Blast : …अन् झाला स्फोट! 9 कामगारांचा जागीच गेला जीव

दुबईतील भेटीनंतर पीडितेच्या भावाने तिला जिंदलच्या कंपनीशी संपर्कात राहून चांगली मालमत्ता दाखवण्यास सांगितले होते. या भेटीच्या दोन महिन्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये तिने जिंदलला मुंबईला परतल्यावर भेटीसाठी मेसेज केला. यानंतर जयपूरध्यमे पीडीत महिला तिच्या भावासोबत जिंदालला भेटली होती. या भेटी दरम्यान जिंदालने तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. आणि तिला हॉटेलमध्ये भेटण्यास सांगितले होते. मात्र पीडितने यावर त्याला रेस्टॉरंट किंवा मीटिंग रूममध्ये भेटायला सांगितले. यावर, जिंदालने गोपनीयतेच्या चिंतेमुळे तो तिला सार्वजनिक ठिकाणी भेटू शकत नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सज्जन जिंदाल यांनी पीडीतेला त्यांच्या मुंबईतील बीकेसीतील कार्यालयात भेटायला बोलावले होते. यावेळी पीडीत महिला संध्याकाळी 7 च्या सुमारास त्यांच्या कार्यालयात पोहोचली होती. या दरम्यान इमारतीच्या पेंटहाऊसमध्ये आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडीत महिलेने केला आहे. तसेच आरोपीने तिच्याशी लग्न करण्याचेही वचन दिल्याचे पीडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे. जिंदल विवाहित असून देखील त्यांनी रोमँटीक भावना वक्त केल्या होत्या.ही घटना जानेवारी 2022 मध्ये जिंदालच्या मुंबईतील कार्यालयात घडल्याचे पीडीत महिला तक्रारीत सांगते.

हे ही वाचा : Chhagan Bhujbal : “काय त्याचे लाड चाललेत…”, जरांगेंवर बाण, भुजबळांचा सरकारला इशारा

या प्रकरणी पीडित महिलेने फेब्रुवारी महिन्यात पोलीसात एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तिच्या तक्रारीचे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे पीडीतेला न्यायासाठी मुंबई हायकोर्टात धाव घ्यावी लागली होती. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर आता बीकेसी पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम 376 (बलात्कार), 354 (महिलेवर प्राणघातक हल्ला आणि गुन्हेगारी बळाचा वापर, तसेच महिलेची प्रतिष्ठा भंग करणे) आणि कलम 506 (गुन्हेगारी धमकी) असे कलम दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT