Crime : गर्लफ्रेंडला निर्जनस्थळी बोलावलं अन् गळा चिरला, बॉयफ्रेंडने हत्या का केली?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

karnataka hassan crime news engineering student kills his girlfriend shocking crime story
karnataka hassan crime news engineering student kills his girlfriend shocking crime story
social share
google news

Karnataka Hassan Crime News : प्रेम प्रकरणातून हत्या करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत देखील एका बॉयफ्रेंडने (Boyfriend) त्याच्या गर्लफ्रेंडची (Girl Friend) हत्या केल्याची घटना घडली आहे. सुचित्रा असे या 21 वर्षीय इंजिनियर तरूणीचे नाव आहे.सुचित्रा आणि आरोपी इंजिनियर तरूण यांचा काही दिवसांपुर्वी ब्रेकअप झाला होता. या ब्रेकअपनंतर ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणात आता आरोपी बॉयफ्रेंडने तरूणीची हत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहेत. (karnataka hassan crime news engineering student kills his girlfriend shocking crime story)

कर्नाटकच्या हसन (Karnataka Hassan) जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील 21 वर्षीय तरूणी सुचित्रा हिचा मृतदेह आढळला होता. या घटनेने एकच खळबळ माजली होती. या प्रकरणात सुचित्राची हत्या तिच्याच प्रियकराने केल्याचा आरोप होता. ब्रेकअपमुळे प्रियकराने तिची हत्या केली असावी, असा संशय होता. या संशयातून पोलिसांनी 23 वर्षीय इंजिनियर तेजसला अटक केली होती.

हे ही वाचा :Shiv Sena: ‘बाप चोरणारे.. जे गुवाहटी, सूरतला पळून गेले त्यांनी..’, राड्यानंतर आदित्य ठाकरे संतापले

खरं तर, 21 वर्षांची सुचित्रा इंजिनिअरिंगच शिक्षण घेत होती. याच कॉ़लेजमध्ये आरोपी 23 वर्षीय तेजस देखील शिकत होता. या दरम्यान सुचित्राची भेट तेजसशी झाली होती. या भेटीचे हळूहळू प्रेमात रूपांतर झाले. दोघेही प्रेमात पडल्यानंतर काही काळ त्यांच्या नात्यात दुरावा आला. दोघांमध्ये जोरदार भांडणे देखील झाली, त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या ब्रेकअपनंतर तेजसच्या मनात सुचित्राविषयी खुप द्वेष निर्माण झाला होता. या द्वेषातूनच तेजसने सुचित्राच्या हत्येचा कट रचला. या कटाचाच एक भाग म्हणून तेजसने सुचित्राला नात्याबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने कुंठीबेटावर नेले. येथे तेजसने सुचित्राचा गळा चिरला आणि मृतदेह घटनास्थळी सोडून पळ काढला.

हे ही वाचा :ठाकरेंच्या ‘त्या’ दोन नेत्यांनी…, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील राड्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

दरम्यान पोलिसांना स्थानिकांकडून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सुचित्राचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. तसेच या घटनेचा सखोल तपास केला असता संशयाची सुई तेजसवर आली. कारण तेजस आणि सुचित्राचे नुकतेच ब्रेकअप झाले होते. याच रागातून तेजसने सुचित्राची हत्या केल्याचा संशय होता. याच संशयावरून पोलिसांनी तेजसचा माग काढत त्याला अटक केली. तसेच पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सूरू केला आहे. या प्रकरणात अद्याप पोलिसांना हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्र हाती लागले नाही आहे. त्याचसोबत तेजसने नेमकी सुचित्राची हत्या का केली? याचा पोलीस तपास करतायत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT