भयंकर! आईसह 3 मुलांचाही चिरला गळा, रक्ताच्या थारोळ्यात आख्ख्यं कुटुंब
शेजाऱ्याच्या घरात आधी किंकाळ्या आणि रडणं ऐकू आलं, नंतर घरातील सगळ्यांचाच आवाज शांत झाला, म्हणून शेजाऱ्यांनी जाऊन पाहिलं तर आईसह तीन मुलंही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यामुळे आता या हत्याकांडामुळे सगळं राज्याचं हादरून गेलं आहे.
ADVERTISEMENT

Murder Case : कर्नाटकमधील उडुपी (Karnataka Udupi) जिल्ह्यातील मालपे पोलीस स्थानक परिसरातील नेजर गावामध्ये 4 लोकांची हत्या (4 people killed) झाल्याची घटना समोर आली आहे. 47 वर्षाच्या हसीना आणि त्यांच्या तीन मुलांची चाकून भोसकून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात हसीना यांच्या सासूवरही चाकू हल्ला केल्याने त्याही या हल्ल्यात जखमी (injured) झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या निर्घृणपणे झालेल्या या हत्याकांडाची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले चार मृतदेह पोलिसांना दिसून आले.
आईचीही हत्या
या मृतांमध्ये हसीना (वय 46), तिचा मुलगा अफगाण (वय 23), दुसरा मुलगा ऐनाज (वय 21) आणि असीम (वय 12) यांचा या हत्याकांडात समावेश आहे. हसीना 3 मुलांची आई होती. या हत्याकांडात हसीनाच्या सासूवरही चाकूने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रडणाऱ्या मुलालाही चिरले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकऱ्यांची संख्या 3 पेक्षा जास्त असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हे हत्याकांड घडत असतानाच एक बालक घराबाहेर खेळत होते. त्यानंतर घरात झालेल्या हत्याकांडामुळे 12 वर्षाचा मुलगा घरातील दृश्य पाहून रडत होता आणि आरडाओरड करत होता. त्यानंतर आरोपीने त्या लहान मुलाचीही त्याच घरात हत्या केली.
हे ही वाचा >>शारीरिक संबंधाला विरोध केल्याने संतापलेल्या बॉयफ्रेंडने प्रेयसीची केली हत्या, लोखंडी रॉडने….
कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात
हत्या झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहांचा पाहणी करुन पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक केली जाईल असंही पोलिसांनी यावेळी सांगितले.
हत्येचं कारण अस्पष्ट
या हत्याकांडाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, वैयक्तिक हेव्यादाव्यातून हे हत्याकांड झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतरच खरी माहिती उघड होईल असंही पोलिसांनी यावेळी सांगितले.
घरात फक्त किंकाळ्या
एकाच घरातील चार जणांची हत्या झाली असली तरी घरातील कोणतीही वस्तू चोरीला गेली नाही. त्यामुळे ही हत्या दरोड्याच्या हेतूने केली नसून त्या पाठीमागे दुसरे कोणते तरी कारण असावे अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हत्या झाली त्यावेळी घरात कोणीही पुरुष व्यक्ती नव्हती. मात्र घरातील पीडितेच्या किंकाळ्या ऐकल्यानंतर शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे आता पोलिसांनी सासूच्या मुलांशी कोणत्या तरी कारणावरुन वैर आहे का त्याचाही शोध पोलीस घेत आहेत.