कोल्हापूर : माजी सरपंच महिलेचे शेजाऱ्याशी अनैतिक संबंध, शेवटी गोठ्यात केला मर्डर

मुंबई तक

Kolhapur Crime News : शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथे अनैतिक संबंधातून लग्नासाठी दबाव टाकल्याच्या कारणावरून माजी सरपंच सुरेखा न्यारे यांची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रकाश उर्फ बाबू पाटील याला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

Kolhapur Crime News
Kolhapur Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर : माजी सरपंच महिलेचे शेजाऱ्याशी अनैतिक संबंध

point

शेवटी गोठ्यात केला मर्डर

Kolhapur Crime News : शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथे अनैतिक संबंधातून लग्न करण्यासाठी दबाव टाकत असल्याच्या कारणावरून एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरगाव येथील प्रकाश उर्फ बाबू पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत महिला सुरेखा शिवाजी न्यारे या शिरगावच्या माजी सरपंच होत्या. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपीला भिवंडी येथे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा : बीड : तू मला का बोलत नाहीस? विळ्याने हल्ला करत विचारणा, नंतर थेट तरुणाची बॉडी सापडली

लग्नासाठी दबाव टाकल्याने माजी महिला सरपंचाचा खून

मिळालेल्या माहितीनुसार, शिरगाव येथे शेजारी राहणाऱ्या सुरेखा शिवाजी न्यारे आणि प्रकाश उर्फ बाबू पाटील यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. या संबंधातून सुरेखा न्यारे या प्रकाश पाटील याच्याकडे वारंवार लग्न करण्यासाठी आग्रह धरत होत्या. याच कारणावरून आरोपी प्रकाश पाटील चिडला होता. त्यानंतर रविवारी, 26 जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास लिडोरीच्या वाड्याजवळील म्हशीच्या गोठ्यात त्याने सुरेखा न्यारे यांचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : प्रियकराशी बोलताना गोंधळ घालायचा, आईने निष्पाप मुलाला संपवलं, पतीने महिन्याने केला उलगडा