Kolhapur: हिंदू-मुस्लिम प्रेमी युगलाची आत्महत्या, Instagram वर ‘ते’ स्टेटस ठेवलं अन्..
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये एका तरुण प्रेमी युगुलाने प्रेमसंबंधांना विरोध असल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमी युगुलामधील मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

Kolhapur Suicide: दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: लग्नाला विरोध होत असल्याने कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोली इथे एका प्रेमी युगुलाने (hindu muslim couple) आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या युगुलापैकी मुलगी ही अवघ्या सतरा वर्षांची अल्पवयीन होती. तर तरुणाचे देखील वय फक्त 19 वर्ष होतं. (kolhapur crime suicide of hindu muslim couple shared instagram status and later committed suicide)
अरबाज शब्बीर पकाले आणि अल्पवयीन मुलीने एकत्रच दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना आज (2 सप्टेंबर) सकाळी दहाच्या दरम्यान उघडकीस आली.
नेमकं काय घडलं?
कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथे अरबाज शब्बीर पकाले हा आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. त्याच परिसरात 17 वर्षीय मुलगी ही सुद्धा कुटुंबासह राहत होती. अरबाज आणि तरुणीचे गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. अल्पवयीन मुलगी ही इयत्ता अकरावीमध्ये शिकत होती. तर अरबाज हा दहावीनंतर बोअरवेल गाडीवर कामाला जात होता.
त्यांच्यातील प्रेमसंबंधाची कुणकुण सहा महिन्यापूर्वी मुलीच्या घरात लागल्यानंतर कुटुंबाने ताकीद देऊन तिचं कॉलेजला जाण्याचे बंद केले होतं. मात्र त्यानंतरही दोघांचा संपर्क होत होता. आज पहाटे मुलगी अचानक घरातून बाहेर गेली. पण ती बाथरूमला गेली असेल असे वाटल्याने त्याकडे कोणी लक्ष दिले नाही.