Rape Case: Dombivli हादरली… लिव्ह-इन पार्टनर, दारू अन् 19 वर्षीय तरुणीवर मित्रांकडूनच बलात्कार
Dombivli Crime: डोंबिवलीत एका तरुणीवर तिच्याच दोन मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
Dombivli Rape Case: डोंबिवली: डोंबिवलीसारख्या (Dombivli) सुसंस्कृत शहरात सध्या दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे डोंबिवली शहराची ओळख बदलत चालल्याची भीती डोंबिवलीकर व्यक्त करत आहेत. नुकतंच डोंबिवलीतील कुंभारखानपाडा परिसरात एका भयंकर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय तरुणीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन जणांनी मिळून तरुणीवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. (live in partner alcohol and gangrape on 19 year old girl by friends in dombivli)
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सदर पीडित तरुणी ही लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये (Live-in Relationship) राहत होती. दरम्यान ते दोघं ज्या घरात राहत होते ते घर त्यांनी सोडलं होतं. त्यामुळे तरुणी तिचे सामन तिच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी (आरोपी) याच्या घरी ठेवलं होतं.
17 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी पीडित तरुणी आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर हे त्यांचे सामान पाहण्यासाठी दिनेशच्या घरी गेले. त्यावेळी दिनेशसोबत त्याचा आणखी एक मित्र सुनिल हा देखील घरातच होता. हे सर्व जण एकमेकांना ओळखत होते आणि त्यांचे चांगले मित्रही होते. त्यामुळे आरोपी दिनेश आणि सुनिल यांनी पीडित तरुणीच्या पार्टनरला दारु आण असं सांगितलं.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> Pune Murder : दारू पिऊन दोस्तीत केली कुस्ती, अन् नंतर सगळं भयानकच घडलं
सगळे मित्र असल्याने पीडितेचा लिव्ह-इन पार्टनर देखील दारु आणण्यासाठी निघून गेला. त्यावेळी दिनेश, सुनील आणि तरुणी असे तिघेच घरात होते. पण याचवेळी आरोपी दिनेश गडारी याने आपली वासना शमविण्यासाठी तरुणीवर अत्याचार केला.
थोड्या वेळाने पीडितेचा लिव्ह-इन पार्टनर हा दारू घेऊन आल्यानंतर तरुणीने त्याला सर्व घडलेला प्रकार सांगितला. आपल्याच मित्रांनी आपला असा घात केल्याचं समजातच तरुणही संतापनला आणि त्याने दोन्ही आरोपींना जाब विचारला. त्यावेळी दोनही आरोपींनी तरुणाला बेदम मारहाण केली.
ADVERTISEMENT
यावेळी पीडित तरुणी मदतीसाठी घराबाहेर धाव घेतली. पण आरोपी दिनेश आणि त्याचा मित्र सुनिलने तिचा पाठलाग करुन तिला एका रिक्षात जबरदस्तीने कोंबलं आणि तिथेच तिच्यावर जबरी सामूहिक बलात्कार केला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> RK Puram Murder : क्लार्कने बॉसला घरी बोलवले अन् केले तुकडे; भयंकर हत्याकांड
दरम्यान, या प्रकरणी पीडित तरुणीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी दिनेश याला अटक केली असून कल्याण न्यायालयात हजर केलं असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर फरार आरोपी सुनिल याला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT