Madurai Train fire : रेल्वेत गॅस सिलिंडर घेतला अन् डबा पेटला; प्रायव्हेट पार्टी कोचमधील 10 जण होरपळले

मुंबई तक

ADVERTISEMENT

madurai train fire, Tamil Nadu madurai rail accident 20 death
madurai train fire, Tamil Nadu madurai rail accident 20 death
social share
google news

Madurai Train Accident : तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेला (Railway accident) आग लागल्याची दुर्देवी घटना घडली आहे. रेल्व प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार लखनऊहून रामेश्वरकडे निघालेल्या ट्रेनच्या एका डब्यात आग लागल्याने 10 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे. या दुर्देवी घटनेनंतर रेल्वेकडून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. एका प्रायव्हेट पार्टीने 17 ऑगस्ट रोजी त्यांनी लखनऊमधून प्रवासाला सुरुवात केली होती. उद्या ते चेन्नईला पोहचणार होते. त्यानंतर ते पुन्हा लखनऊला परतणार होते.

ADVERTISEMENT

रेल्वे डब्यात गॅस सिलिंडर

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वेच्या एका डब्याला आग लागली तेव्हा पहाटेचे सव्वा पाच वाजले होते. त्यावेळी रेल्वे मदुराई स्टेशनवर थांबली होती. रेल्वे प्रशासनाने या अपघाताबद्दल बोलताना सांगितले की, रेल्वेच्या एका डब्यात काही लोकं गॅस सिलिंडर घेऊन घुसले होते. त्यानंतर ही दुर्देवी घटना घडल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हे ही वाचा >>Nawab Malik: मलिक अजितदादा की पवार गटात? नवाब मलिकांच्या मुलीचं मोठं विधान

मोठा अनर्थ टळला

या दुर्देवी घटनेची माहिती देताना रेल्वे प्रशासनाने सांगितले की, लखनऊहून 65 प्रवाशी एकत्र प्रवास करत होते. त्यानंतर रेल्वे पहाटे पावणे चार वाजता रेल्वे मदुराईला पोहोचली. आरक्षित केलेल एका डब्यात काही प्रवाशांनी चहा/नाश्ता तयार करण्यासाठी अवैधरित्या सिलिंडर डब्यात घेतले होते. त्यामुळेच रेल्वेच्या एका डब्याल आग लागली. डब्याला आग लागल्याचे समजताच प्रवाश्यांनी रेल्वे डब्यातून बाहेर उड्या मारल्या. त्या एकाच डब्याला आग लागल्यामुळे इतर प्रवाशांना त्याचा धोका पोहचू शकला नाही.

हे वाचलं का?

मृतांच्या वारसांना 10 लाखाची मदत

रेल्वेच्या या दुर्घेटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले आहे. तर मृतांच्या वारसदारांना धीर देत ही घटना अत्यंत दुःखदायक असून मृतांविषयी त्यांनी संवेदना व्यक्त केली आहे. या घटनेतील गंभीर जखमींवर तात्काळ उपचार करण्याच्याही सूचना दिल्या असून रेल्वे प्रशासनाला त्यांनी घटनेची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा >>Krishnagiri: युट्यूबवर व्हिडिओ पाहून घरीच डिलिव्हरी…,बायकोसोबत घडली भयंकर घटना

आगीचा व्हिडिओ व्हायरल

रेल्वे डब्याला आग लागल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्या व्हिडिमध्ये रेल्वे डब्याला लागलेली आग आणि घाबरुन ओरडणारी लोकं त्यामध्ये दिसत आहेत. ही आग लागलेली असतानाच त्या ट्रॅकजवळून आणखी एक रेल्वे जात असल्याचे दिसत आहे. ही आग लागताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले.

ADVERTISEMENT

रेल्वेत ज्वलनशील पदार्थ

ही दुर्घटना घडल्यानंतर रेल्वे स्पष्ट केले आहे की, रेल्वेतून अवैधरित्या गॅस घेऊन जात असल्यामुळेच ही एका कोचला आग लागली. रेल्वेच्या नियमानुसार रेल्वेतून ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणे गुन्हा आहे असंही त्यांनी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT