आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, रागाच्या भरात दगडाने ठेचून हत्या

योगेश पांडे

ADVERTISEMENT

man killed in nagpur railway station with stone nagpur crime story
man killed in nagpur railway station with stone nagpur crime story
social share
google news

मुंबईच्या मीरा रोडमध्ये (Mira Road) गुरुवारी लिव्ह इन पार्टनर (Live In Partner) हत्याकांड घडलं होतं. या हत्याकांडातील आरोपीने दाखवलेली विकृती पाहून संपूर्ण देश हादरला होता. आता अशीच विकृतीची एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. या घटनेत आरोपीने आई-बहिणीला शिव्या दिल्याच्या कारणाने त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर (Nagpur Railway Station) ही घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी दिनेश धोंडिबाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण नागपूर शहर हादरलं आहे. (man killed in nagpur railway station with stone nagpur crime story)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर रेल्वे स्टेशन परीसरात जीआरपी पोलीस पेट्रोलिंग करत होते. या पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना प्लॅटफॉर्म नंबर 5 वर रक्ताने माखलेली एक मृतदेह सापडला होता. जितेंद्र उर्फ टोपी असे या मृत व्यक्तीचे नाव होते, तो छत्तीसगडचा रहिवासी होता. यावेळी पोलिसांनी तत्काळ रेल्वे स्टेशन परीसरातील सीसीटीव्ही तपासून संपूर्ण घटना आणि आरोपीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान आरोपीने दगडाने ठेचून पिड़ीत व्यक्तीची हत्या केल्याची माहिती मिळाली होती. या हत्येनंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता.

हे ही वाचा : Mira Road Murder: ‘HIV पॉझिटिव्ह, शारीरिक संबंध…’ मनोज साने प्रचंड चाणाक्ष आरोपी!

‘या’ कारणामुळे केली हत्या

या घटनेला अवघे काही मिनिटचं झाल्याने पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी दाखल होऊन आरोपीची शोधाशोध सूरू केली. यावेळी आरोपी हा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभा होता.पोलिसांनी यावेळी लगेच त्याला ताब्य़ात घेतले.यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने हत्येमागचं सत्य सांगितलं. मृत व्यक्ती जितेंद्र त्याच्या आईला आणि बहिणीला शिविगाळ करत होता. तसेच आरोपीने त्याला शिविगाळ करण्यास रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरी देखील तो शिविगाळ करतच होता. याच घटनेतून संतप्त होत, आरोपी दिनेशने दगडाने हल्ला करून जितेंद्रची हत्या केली होती. विशेष म्हणजे दगडाने हत्या होईल, याची त्याला कल्पना देखील नव्हती.

हे वाचलं का?

या प्रकरणावर पोलीस मनिषा काशिद म्हणाल्या की, पोलिसांनी जितेंद्रचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पीडितया प्रकरणातील आरोपी दिनेश धोंडिबाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तो महाराष्ट्र पुणेचा रहिवाशी आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान याआधी नागपूरच्या भिवापूर नागभीड रोडवरील भारत पेट्रोल पंपच्या मालकांवर अज्ञात आरोपींनी चाकूने 29 वेळा भोसकून हत्या केली होती.या हत्येनंतर 1 लाख 34 हजार रूपये लुटून आरोपींनी पोबारा केला होता. या घटनेचा संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास करून तीन आरोपींना ताब्य़ात घेतले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखून कोर्टात हजर करण्यात आले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : किचनमधली दृश्य पाहून पोलिसांचीही तंतरली, मीरा रोड हत्याकांडाची FIR जशीच्या तशी!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT