Mira Road : ‘या’ माणसामुळे मनोज सानेने केलेल्या लिव्ह-इन पार्टनरच्या हत्याकांडाचं बिंग फुटलं
मीरारोड येथे लिव्ह-इन पार्टनरची हत्येप्रकरणी आता नवनवीन गोष्टी समोर येत आहे. मात्र, ही हत्या ज्या माणसामुळे जगासमोर आली त्याने नेमकं काय सांगितलं हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

Latest Marathi News: मीरारोड: क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडणारी एक घटना मुंबई नजीकच्या मीरारोड (Mira Road Murder) येथे घडली आहे. लिव्ह-इन पार्टनरची हत्या आणि तिच्या मृतदेहाची लावलेली विल्हेवाट यामुळे संपूर्ण मीरारोडमध्ये एकच खळबळ माजली आहे. हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव मनोज साने (वय 56) (Manoj Sane) वर्ष आहे. ज्याने झाड कापण्याच्या कटरने महिलेचे अत्यंत क्रूरपणे तुकडे केले आणि त्यानंतर कूकरमध्ये ते तुकडे शिजवून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, हे सगळं प्रकरण एका माणसामुळे बाहेर आलं. याच सगळ्या प्रकरणाबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (manoj sane saraswati vaidya live in partner miraroad crime dead body cooker shraddha walkar murder)
नेमकी घटना काय?
बुधवार (7 जून) सायंकाळी पोलिसांचे पथक अचानक मीरा रोडवरील गीता आकाश दीप सोसायटीत पोहोचले आणि थेट सातव्या मजल्यावरील एका फ्लॅटजवळ गेले जिथून प्रचंड दुर्गंधी येत होती. जेव्हा पोलीस या फ्लॅटजवळ पोहचले तेव्हा त्यांना देखील प्रचंड धक्का बसला, कारण दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणाबाबत त्यांनी मीडियामध्ये जे काही वाचले आणि ऐकले तेच त्यांना मीरारोडमध्ये पाहायला मिळालं होतं.
घरात सापडले तीन कटर
यावेळी पोलिसांना फ्लॅटमधून महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. सरस्वती वैद्य (वय 36 वर्ष) (Saraswati Vaidya) असे या महिलेचे नाव आहे. यावेळी पोलिसांना घरातच झाडे तोडण्यासाठी वापरलेला कटरही पोलिसांना यावेळी सापडला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ 56 वर्षीय आरोपी मनोज साने याला अटक केली. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता यातून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.