Mira Road Murder : लिव्ह इन पार्टनरचे लाकूड कापायच्या मशीनने केले तुकडे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Woman Killed and Chopped Into Pieces By Live In Partner In Mumbai’s Mira Road, Nayanagar police Arrested Accused
Woman Killed and Chopped Into Pieces By Live In Partner In Mumbai’s Mira Road, Nayanagar police Arrested Accused
social share
google news

Mira road live in partner murder : वसईतील श्रद्धा वालकर हत्याकांड तुम्हाला आठवत असेल, लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या श्रद्धाची तिच्याच प्रियकराने हत्या केली आणि नंतर तुकडे करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. थरकाप उडवणाऱ्या या घटनेसारखीच घटना मुंबई उपनगरातील मीरा रोड परिसरात घडली आहे. 56 वर्षीय व्यक्तीने 36 वर्षीय लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. इतकेच नाही, तर लाकूड कापायच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे केले. क्रूरतेचा कहर म्हणजे तुकड्यांची विल्हेवाट लावण्याआधी त्याने ते उकडून काढले, असंही आता समोर आलं आहे. या घटनेने मुंबई उपनगरात खळबळ उडाली आहे. (Woman kill and Chopped Into many Pieces By Live-In Partner At Mira Road area)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा रोड परिसरातील नयानगर पोलीस ठाणे हद्दीत गीता आकाश दीप सोसायटीमध्ये ही घटना घडली. गीता आकाश दीप सोसायटी इमारतीत सातव्या मजल्यावर मनोज साहनी (वय 56) आणि सरस्वती वैद्य (36) हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. हत्येचा प्रकार समोर येईपर्यंत मनोज साहनी याने सरस्वतीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि अर्ध्या मृतदेहाची विल्हेवाटही लावली होती.

Mira Road Crime News : दुर्गंधी आली अन्…

मनोज आणि सरस्वती राहत असलेल्या फ्लॅटमधून आजूबाजूच्या लोकांना दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता अधिकारीही हादरले. घरात मृतदेहाचे तुकडे आढळून आले.

हे वाचलं का?

हेही वाचा >> Mumbai : “ती म्हणायची सुरक्षारक्षकाची भीती वाटते”, ‘त्या’ तरुणीने वडिलांना काय सांगितलं होतं?

तुकडे उकडले आणि मिक्सरमध्ये

मनोज साहनीने सरस्वतीची हत्या केल्यानंतर लाकूड कापायच्या कटरने मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर त्याने हे तुकडे प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये ठेवले होते. मृतदेहाचे तुकडे तो प्रेशर कुकरमध्ये उकडून घ्यायचा. त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारिक करायचा. बारीक केलेले मांस नंतर नाल्यात नेऊन टाकायचा. अशा पद्धतीने त्याने अर्ध्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा >> Sanjeev Jeeva: थेट कोर्टातच केली अतिकसारखी हत्या, गँगस्टरच्या डोक्यातच झाडल्या गोळ्या

आरोपीला अटक

पोलिसांनी फ्लॅटमधून मृतदेहाचे उर्वरित तुकडे ताब्यात घेतले. त्याचबरोबर आरोपीने हत्येसाठी वापरलेले साहित्यही जप्त केले आहे. मनोजने वापरलेले मशीन, कूकर आणि बाईकही पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. त्यावेळी त्याने हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले. ते प्रेशर कुकरमध्ये शिजवून मिक्सरमध्ये बारीक करून फेकून दिल्याची कबूली दिली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT