Mira Road Murder: ‘मी HIV पॉझिटिव्ह, सरस्वतीसोबत…’ मनोज सानेचा दावा
Marathi news of Today: लिव्ह-इन पार्टनरची हत्या करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या मीरा रोडमधील आरोपी मनोज सानेने आपल्या कबुली जबाबात अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
ADVERTISEMENT

Mira Road Murder Case: मुंबई: मुंबईजवळील मीरा रोड येथील गीता नगर भागात मनोज साने नावाच्या एका व्यक्तीची आपल्या लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या (Mira Road Murder) केल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्या घटनेने संपूर्ण देश हादरवून गेला आहे. मनोज सानेने (Manoj Sane) सरस्वती वैद्य (Saraswati Vaidya) हिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे करुन ते प्रेशर कुकरमध्ये (Cooker) शिजवले आणि त्याची विल्हेवाट लावली. याच प्रकरणी अटक केलेल्या मनोज सानेने आता चौकशीदरम्यान एक खळबळजनक दावा केला आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, तो एचआयव्ही पॉझिटिव्ह (HIV Positive) होता आणि त्याचे मृत महिलेशी कधीही शारीरिक संबंध नव्हते. (mira road murder manoj sane saraswati vaidya live in partner hiv positive daughter sexual relations crime news)
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी मनोज सानेने पोलिसांना सांगितले की, सरस्वती वैद्य ही त्याला मुलीसारखी होती. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी अटक करण्यात आलेला आरोपी मनोज रमेश साने (वय 56 वर्ष) याने दावा केला आहे की, 32 वर्षीय सरस्वती वैद्य हिने 3 जून रोजी आत्महत्या केली होती. पण आपल्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीने त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने स्वत: देखील आत्महत्येचा विचार केल्याचं पोलिसांना जबाबात सांगितले.
पूछताछ के दौरान आरोपी(मनोज साने) ने पुलिस को बताया कि सरस्वती वैद्य ने 3 जून को आत्महत्या कर ली थी। वह डर गया था कि उस पर उसकी हत्या का आरोप लगाया जाएगा, इसलिए उसने उसके शरीर को ठिकाने लगाने का फैसला किया। उसने पुलिस को बताया कि उसने उसके शरीर के टुकड़े किए और बदबू से बचने के लिए…
— ANI_HindiNews (@AHindinews) June 9, 2023
‘मी HIV पॉझिटिव्ह, कधीही सरस्वतीसोबत लैंगिक संबंध नाही’
चौकशीदरम्यान सानेने जो जबाब दिला त्याची आता पोलीस पडताळणी करत आहे. पोलिसांनी सांगितले की, इलेक्ट्रिक ट्री कटरने मृतदेहाचे छोटे तुकडे केल्यानंतर, सानेने त्याचे काही भाग प्रेशर कुकरमध्ये उकळले आणि सहज विल्हेवाट लावण्यासाठी गॅसवर भाजले देखील. एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्याने हे तुकडे स्वयंपाकघरात बादल्या, टब, कुकर आणि इतर भांडीमध्ये ठेवले होते ते तुकडे इतके लहान केले होते की पोलिसांना ते मोजताही आले नाहीत.