मच्छर मारणाऱ्या कॉईलने घेतला एकाच कुटुंबातील 6 जणांचा जीव, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

मच्छरच्या कॉईलने कुटूंबातील सहा जणांचा घेतला बळी
मच्छरच्या कॉईलने कुटूंबातील सहा जणांचा घेतला बळी
social share
google news

Mosquito coil kill six people : मच्छर चावून आजार होऊ नये यासाठी प्रत्येकजण घरात मच्छरची कॉईल (Mosquito coil) लावून झोपत असतो. मात्र मच्छरची कॉईल लावून झोपणं एका कुटूंबाच्या जीवावर बेतलं आहे. या घटनेत एकाच कुटूंबातील 9 जण गंभीर जखमी झाले होते.यातील आता सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले आहेत, तर जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजलीय. (mosquito coil pillow caught fire due to suffocation 6 family member dead delhi shastri park incident)

एका घरातील सहा जणांचा मृत्यू

शास्त्री पार्क परीसरातली मच्छी मार्केट भागात ही धक्कादायक घटना घडलीय. एका घरात आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांसह अग्निशमन दलालाही याची माहिती देण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी घरात शिरताच पोलिसांना मोठा धक्का बसला. अनेक नागरीकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जखमी होते. या घटनेत 4 पुरूष, 1 महिला आणि दीड वर्षाच्या मुलाचा घरातच मृत्यू झाला. तर तीन जणांची प्रकृती चिंतानजक होती. पोलिसांनी जखमींना तत्काळ रूग्णालयात दाखल केले, तर मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी पाठवले.

हे ही वाचा : घरात नवरा-बायकोसारखे राहायचे चुलत भाऊ-बहीण, सत्य समोर येताच घडलं फारच…

मच्छरची कॉईल ठरली मृत्यूचे कारण

या घटनेत कुटूंबियांनी मच्छर पळविण्यासाठी लावलेली कॉईल मध्यरात्री गादीवर पडली होती. गादीवर कॉईल पडल्यामुळे संपुर्ण घरात धुर धुर झाला. या धुरात गुदमरून सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. तसेच फायरब्रिगेडने घटनास्थळी दाखल होत आग विझवली होती. या घटनेत अजमत, हमजा, जाहिदा, दानिश, निशाद आणि फैजूलचा गुदमरून मृत्यू झाला. तर सोनी (वय 15) आणि जियारूल (वय 45) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर 22 वर्षाचा तरूणाला या घटनेत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : IAS अधिकाऱ्याच्या आजी-आजोबांची आत्महत्या, काळीज पिळवटून टाकणारी सुसाईड नोट

दरम्यान या घटनेत पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. आता पोस्टमार्टम अहवालात मृत्यूचे कारण काय समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलिस करत आहेत. ही घटना दिल्लीच्या शास्त्री पार्क परीसरात घडलीय.

मच्छरची कॉईल (Mosquito coil) जळवून झोपल्यावर घरातील धूर बाहेर जात नाही. त्यामुळे कार्बन मोनोक्साईड घरात जमा होतो.त्यानंतर हा कार्बन मोनोक्साईड शरीरात जातो. ज्यामुळे नागरीकांना श्वास घेण्यास अडचणी येतात आणि गुदमरून मृत्यू ओढवतो. एक कॉईल 100 सिगारेट इतका खतरनाक असतो. हा कॉईल शरीरासाठी नुकसानदायक असतो अशी माहिती एका रिसर्चमधून आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT