Mumbai: जुहूमध्ये पोलिसासोबत राहायची लिव्ह-इनमध्ये, तरुणीचा मृतदेह पाहून अवघी सोसायटी हादरली!

मुंबई तक

ADVERTISEMENT

nurse living live-in relationship in Juhu Mumbai, died after falling from the third floor building partner police arrested police
nurse living live-in relationship in Juhu Mumbai, died after falling from the third floor building partner police arrested police
social share
google news

Mumabi Crime: मुंबईत राहणाऱ्या एका महिलेचा संशयितरित्या मृत्यू झाल्याचे उघड झाली आहे. त्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मुंबईतील अलिशान समजल्या जाणाऱ्या जुहू परिसरातील (mumbai juhu) आहे. जुहूमधील एका बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरून बुधवारी खाली पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर घटनास्थळी प्रचंड मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर महिलेबरोबर राहणारा लिव्ह इनमध्ये (Live in Relationship) राहणारा प्रियकरही तिथे पोहचला होता. (mumbai crime juhu nurse living live-in relationship in fell to her death building, police boyfriend into custody)

ADVERTISEMENT

तिसऱ्या मजल्यावरुन उडी

महिला इमारतीवरुन खाली पडल्यानंतर त्या महिलेला तिच्या प्रियकराने तिला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. ही घटना घडताच पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी ठार झालेल्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

हे ही वाचा >> Konkan: गणपती विसर्जन केलं अन् मुंबईला एकटाच निघाला, रस्त्याच काळाने घातली झडप

पेशाने होती नर्स

पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर समजले की, 35 वर्षाची असणारी महिला ही पेशाने नर्स होती. तिचा पहिल्या पतीबरोबर घटस्फोट झाला होता व तिला एक मुलगाही आहे. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती एक पोलीस असणाऱ्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिनमध्ये राहत होती. तर आज त्याच महिलेचा इमारतीवरुन पडून मृत्यू झाल्यामुळे तिच्याबरोबर राहणाऱ्या पोलिसाला ताब्यात घेतले आहे, त्याची आता चौकशी करण्यात येत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरेंच्या वकिलाने मांडला गंभीर मुद्दा

हातावरही जखमा

पोलिसांनी आता चौकशीला सुरुवात केली असून महिला इमारतीवरुन कशी पडली की तिला कोणी धक्का देऊन खाली पाडले आहे. शवविच्छेदनानंतर तिच्या हातावर जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र तिच्याबरोबर राहणाऱ्या प्रियकराने सांगितले की ती स्वतःच इमारतीवरुन खाली पडली आहे. इमारतीवरुन खाली पडण्याआधी तिने हाताची नसही कापून घेतली होती. यावेळी त्याने सांगितले की मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तरीही पोलिसांनी चौकशी चालू ठेवली असून डॉक्टरांच्या अहवालानंतर आणखी काही उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT