loco pilot suicide : … आणि लोको पायलटने आयुष्यच संपवलं, कल्याणमधील घटना

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

loco pilot of csmt lobby commits suicide in kalyan
loco pilot of csmt lobby commits suicide in kalyan
social share
google news

Kalyan crime news : कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेमध्ये लोको पायलट असलेल्या एका व्यक्तीने आत्महत्या करून आयुष्य संपवलं. सुजित कुमार असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. सुजित कुमारने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचं काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, सुजित कुमार मुंबई लोकलमध्ये लोको पायलट होता. सुजित कुमारला प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून छळण्यात आल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे.

वाचा >> Nanded Crime: फळ विक्रेत्याने दोन्ही हात कोयत्याने तोडले, कारण फक्त हसला अन्…

‘सुजित कुमारने प्रशिक्षण पूर्ण केले. त्यात तो पासही झाला होता. पण, नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याला ड्युटीवर घेतलेच नाही. त्याला तब्बल तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं. सुजित कुमार सप्टेंबर महिन्यापर्यंत निलंबित केलं गेलं आहे’, असं लोको पायलट म्हणून कार्यरत असलेल्या हरीश चिंचोले यांनी सांगितलं.

वाचा >> Kalyan Crime: आईसमोरच सपासप वार…! 12 वर्षाच्या मुलीने सोडला जीव

आत्महत्या केलेल्या सुजित कुमारचा मृतदेह रुख्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आला. इथे मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. दरम्यान, ही माहिती मिळताच अनेक रेल्वे कर्मचारी रुग्णालयाबाहेर जमा झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलीये.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> Mumbai crime: सेक्सला नकार… 18 वर्षीय मैत्रिणीचं भिंतीवर आपटलं डोकं, उशीने दाबलं तोंड

‘प्रशासनाकडे आमची हीच मागणी आहे की, जो सीनियर सीसी जॉर्ज आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं. त्यांची चौकशी करण्यात यावी. कोणत्याही दबावाशिवाय ही चौकशी करून आम्हाला न्याय देण्यात यावा, अशी मागणी लोको पायलट असलेल्या साईप्रसाद कनोजिया यांनी केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT