Mumbai Crime : “आमच्यावर ऑफिसमध्ये बलात्कार, गर्भपात…”, आठ महिला पोलिसांच्या पत्राने खळबळ
आठ महिला पोलीस चालकांनी एक उपायुक्त आणि दोन पोलीस निरीक्षकांनी सरकारी वाहनातून रूमवर नेऊन वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तसेच दोन्ही पोलीस निरीक्षक आठवड्यातून तीन दिवस आम्हाला जबरदस्ती घरी घेऊन जातात आणि आमच्यावर आळीपाळीने बलात्कार करतात.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातून खळबळ उडवून टाकणारी बातमी समोर आली आहे. सध्या पोलीस दलात एक लेटरबॉम्ब प्रचंड व्हायरल होत आहे. या लेटरबॉम्बच्या माध्यमातून 8 चालक महिला पोलीस शिपायांनी (Women Police Constable) बलात्काराचे आरोप केले होते. विशेष म्हणजे हे बलात्काराचे आरोप त्यांनी त्यांच्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर केले आहेत. त्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पत्रात नावे असलेल्या महिला पोलिसांनी बलात्कार झाल्याचा दावा फेटाळला आहे. दरम्यान पोलीस दलाला हादरवू टाकणारे हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. (mumbai police 8 women police rape by senior cop women constable letter viral mumbai crime news)
ADVERTISEMENT
लेटरबॉम्बमध्ये काय?
नागपाडा मोटार परिवहन विभागातच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या 8 पीडित महिला नागपूर मोटार परिवहन विभागात चालक पदावर कार्यरत आहेत. या आठ महिला पोलीस चालकांनी एक उपायुक्त आणि दोन पोलीस निरीक्षकांनी सरकारी वाहनातून रूमवर नेऊन वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तसेच दोन्ही पोलीस निरीक्षक आठवड्यातून तीन दिवस आम्हाला जबरदस्ती घरी घेऊन जातात आणि आमच्यावर आळीपाळीने बलात्कार करत असल्याचाही आरोप पत्रात केला आहे.
हे ही वाचा : Lok Sabha 2024 : राणे-सामंत संघर्ष पेटणार की शमणार! शिंदे काय देणार ‘मेसेज’?
या पोलीस निरीक्षकांनी आमचे अश्लील व्हिडिओ देखील बनवले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याकडून दरमहा एक हजार रूपये लाच स्विकारत असल्याचाही आरोप महिला शिपायांनी केला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून हा सर्व प्रकार सुरु आहे. या बलात्कारामुळे महिला पोलीस गर्भवती राहिल्या होत्या. त्यामुळे त्यांना गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले होते. या प्रकरणी आवाज उठविला असता आमची बदली करण्यात आल्याचेही महिला शिपायांनी म्हटले आहे.
हे वाचलं का?
या पत्रात आठ महिला पोलीस शिपायांची नावे असून त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन सीबीआय , गुन्हे शाखा आणि सायबर सेलमार्फत चौकशी करून सबंधित अधिकऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे
महिला पोलीस शिपायांचे म्हणणे काय?
दरम्यान हे लेटर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून महिला पोलीस शिपायांना त्यांच्या कुटुंब, नातेवाईकांकडून आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून सतत फोन येत आहेत. तसेच वरील हे सर्व आरोप महिला पोलीस शिपायांनीच फेटाळले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Raj Thackeray : “…तर मी तुम्हाला बांबू लावेन”, ठाकरेंच्या संतापाचा कडेलोट
“हे पत्र व्हायरल झाल्यापासून मला एकामागून एक कॉल येत आहेत. सुरुवातीला वाचून मला धक्काच बसला कारण मी असे कोणतेही पत्र लिहिले नव्हते. माझे कुटुंबीय घाबरले, आणि पत्रातील मजकूर खरा आहे या विचाराने माझे पालक अस्वस्थ झाले आहेत. त्यांनाही नातेवाईक आणि मित्रांकडून फोन येऊ लागले,” असे एका महिला कॉन्स्टेबलने सांगितले.
ADVERTISEMENT
कथित पत्रात माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांना मी पाहिलेही नाही.हे माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे. मी शनिवारी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. पण त्यांनी मला सविस्तर अर्ज लिहायला सांगितले आणि मला ज्यांचा संशय आहे त्यांची नावेही लिहायला सांगितली. पण मला कामावर जायचे होते, म्हणून मी तेव्हा तक्रार केली नाही. पण मी सोमवारी परत जाईन तक्रार नोंदवायला,”, असे दुसऱ्या एका महिला कॉन्स्टेबलने म्हटले आहे.
दरम्यान पोलीस दलात खळबळ उडवून टाकणारे हे लेटरबॉम्ब माटुंग्यातून स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आले होते. या प्रकरणी आता पोलीसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच हे पत्र पाठवणाऱ्या आरोपीचे ओळख पटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
या प्रकरणावर सह पोलिस आयुक्त एस जयकुमार इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, सुरुवातीला आम्ही या बलात्काराच्या आरोपांची चौकशी करत होतो. मात्र आठ महिला पोलीस शिपायांनी अशा प्रकारचे कोणतेच पत्र न लिहल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता आम्ही पत्र पाठवलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम करत आहोत. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT