Pune, MPSC: ‘दर्शना पवारला राहुल दीदी, दीदी… बोलयचा’, धक्कादायक माहिती समोर
दर्शना पवार हिच्या हत्येसंबंधी आता नवी माहिती समोर आली आहे. आरोपी राहुल हांडोरे याच्यासोबत आपल्या मुलीचे कोणतीही प्रेमसंबंध नव्हते असा दावा दर्शना पवारच्या वडिलांनी केला आहे.
ADVERTISEMENT

Darshana Pawar Murder: पुणे: MPSC परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या दर्शना पवारच्या (Darshana Pawar) हत्येचं (Murder) खरं कारण काय? याचं गूढ अजूनही कायम आहे. आरोपी राहुल हांडोरे (Rahul Handore) हा दर्शनाचा बालपणीचा मित्र होता. पुण्यात (Pune) राहत असताना राहुल हा अनेकदा दर्शनाला तिच्या रुमवरुन तिला MPSC क्लासमध्ये देखील बाइकवरुन सोडायचा. असंही अनेक जण सांगत आहेत. मात्र, तिच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनाने MPSC चा क्लासच लावला नव्हता. ती स्वत:च अभ्यास करायची. आता याच सगळ्याबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी या तपासात समोर आल्या आहेत. (murder mpsc topper darshana pawar father claimed daughter no relationship accused rahul handore pune crime news)
दर्शनाच्या वडिलांचा धक्कादायक दावा…
दर्शना नेमकी कसा अभ्यास करायची याबाबत जेव्हा आम्ही दर्शनाच्या वडिलांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की, दर्शना ही आधीपासूनच अभ्यासात हुशार होती. तिला दहावीत 93 टक्के गुण होते. बारावीमध्ये 92 टक्के गुण.. आणि ग्रॅज्युएट होईपर्यंत ती तिच्या वर्गात पहिली किंवा दुसरीच असायची.
कोव्हिड काळात तिने यूपीएससीचा अभ्यास देखील करत होती. तसंच ती आवर्जून ज्ञानेश्वरी देखील वाचायची. महाभारत, रामायण आणि गीता पठण देखील ती करायची. दर्शना मुळात हुशार असल्याने तिच्याकडून तिच्या कुटुंबीयांना बऱ्याच अपेक्षा होत्या.
दर्शनाला काय सांगून राहुल हांडोरेने राजगडाकडे नेलं याचं सुद्धा गूढ कायम आहे. त्या प्रश्नांची उत्तरं मिळविण्याचा पोलीस आता प्रयत्न करत आहेत.