Beed : गर्भवती सून मोबाईलवर बोलत असताना सासऱ्याने घातली होती कुऱ्हाड, आता…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Murder of pregnant daughter-in-law by father-in-law
Murder of pregnant daughter-in-law by father-in-law
social share
google news

Murder of pregnant daughter-in-law by father-in-law बीड : मुलाने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून बापाने (father-in-law) गर्भवती सुनेला (daughter-in-law) ठार मारून स्वतःच्या पत्नीवरही प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने बीड (Beed) जिल्हा हादरला होता. या प्रकरणात आता 3 वर्षानंतर सासरा बालाजी लव्हारेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. (murder of pregnant daughter-in-law court father-in-law sentenced to life imprisonment beed story)

घटनाक्रम काय?

आरोपी बालाजी लव्हारेच्या मुलाचा शीतल हिच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. या प्रेमविवाहाचा राग बालाजी यांच्या मनात होता. या रागातूनच सासरे (father-in-law) बालाजी याने 27 ऑगस्ट 2020 रोजी शीतल फोनवर बोलत असताना मानेवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला. यावेळी शीतल सहा महिन्याची गर्भवती होती. दरम्यान, बालाजीची पत्नी सुवर्णा या सुनेला सोडविण्यासाठी गेल्या असता बालाजीने त्यांच्याही पाठीत कुऱ्हाडीने दोन वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे 27 ऑगस्ट 2020 साली सदरील घटना घडली होती.

हे ही वाचा : शेजाऱ्याकडून बायको राहिली गर्भवती; पतीने केलेलं कृत्य ऐकून पोलिसही झाले सुन्न

दरम्यान या प्रकरणी मयत शीतलचे वडील किसन कराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालाजी याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम302, 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सहा. पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने13 साक्षीदार तपासण्यात आले. यात आरोपीची पत्नी आणि मुलीची साक्ष महत्वाची ठरली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. घरत यांनी बालाजी लव्हारे यास दोषी ठरवून जन्मठेप आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने एल. बी. फड यांनी काम पाहिले. दरम्यान या निकालाकडे संपूर्ण बीड जिल्ह्याच्या नजरा लागल्या होत्या.

हे ही वाचा : शारीरिक संबंध ठेवून… महिला पोलीसच करायची भयंकर कृत्य

दरम्यान ही घटना 27 ऑगस्ट 2020 साली घडली होती. आता या घटनेचा निकाल आला आहे.आरोपी सासरा बालाजी लव्हारे यास दोषी ठरवून जन्मठेप आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT