Nagpur: मटणाच्या दुकानात वाद, चॉपरनेच सपासप वार करत घेतला गिऱ्हाईकाचा जीव!
महाराष्ट्रातील नागपूर येथे एका मटणाच्या दुकानात दोन लोकांमध्ये वाद विकोपाला पोहोचला. यादरम्यान संतप्त झालेल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर मांस कापण्याच्या चॉपरने हल्ला केला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
Nagpur Murder Case : महाराष्ट्रातील नागपूर (Nagpur) येथे एका मटणाच्या दुकानात दोन लोकांमध्ये वाद विकोपाला पोहोचला. यादरम्यान संतप्त झालेल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर मांस कापण्याच्या चॉपरने हल्ला केला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. (Nagpur Crime News In mutton shop Shopkeeper stabbed shopper by Chopper)
ADVERTISEMENT
नागपूर येथे मटणाच्या दुकानात दोन व्यक्तींमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर एका 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी रविवारी (8 ऑक्टोबर) दिली.
अंगावर शहारे आणणारा मणिपूरचा व्हिडीओ व्हायरल, तरुणाला जिवंतच जाळलं
साई नगर येथील रहिवासी महेंद्र राम कोहले हे दुपारी मटण घेण्यासाठी मांसाच्या दुकानात गेले होते. जिथे त्यांना एक ओळखीचा माणूस भेटला. त्यांनी सांगितले की, यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. दुकानात उपस्थित असलेल्या आशिक शेख बब्बू शेख रेहमान (22) याने कोहले आणि ओळखीच्या व्यक्तीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
हे वाचलं का?
जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला भर रस्त्यातच जाळून ठार मारलं
मांस कापण्याच्या चॉपरने सपासप वार
पण, कोहले यांनी रेहमानवर राग काढला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, असे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. रागाच्या भरात रेहमानने मांसाचे चॉपर उचलून कोहलेच्या डोक्यावर, छातीवर आणि मानेवर वार केले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जास्त रक्तस्त्राव झाल्यानंतर कोहले यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Weapons of Hamas: ‘हमास’कडे असं काय आहे ज्याने Israel केलं सळो की पळो?
पोलिसांनी आरोपीला केली अटक
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेहमानला भारतीय दंड संहिता (IPC) कलम 302 (हत्या) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT