Nagpur Crime : प्रेयसीला संपवून जंगलात पुरलं, दृष्यम स्टाईलने पोलिसांना चकवा दिला; कसा झाला हत्येचा उलगडा?
Nagpur Crime : गेल्या काही वर्षापूर्वी अभिनेता अजय देवगण स्टारर दृष्यम नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अजय देवगणने एका तरूणाची हत्या केली होती. या हत्येनंतर अजयने बचावासाठी घटनास्थळापासून दुसऱ्याच ठिकाणी असल्याचे पुरावे पोलिसांसमोर सादर केले होते.अशीच काहीशी घटना आता नागपूरमध्ये घडलीय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

एका जवानाने प्रेयसीची हत्या केल्याची घटना

हत्येनंतर जवानाने दृष्यम स्टाईलमध्ये पोलिसांना गुंगारा दिला

कसा झाला हत्येचा उलगडा
Nagpur Crime News : गेल्या काही वर्षापूर्वी अभिनेता अजय देवगण स्टारर दृष्यम नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अजय देवगणने एका तरूणाची हत्या केली होती. या हत्येनंतर अजयने बचावासाठी घटनास्थळापासून दुसऱ्याच ठिकाणी असल्याचे पुरावे पोलिसांसमोर सादर केले होते.अशीच काहीशी घटना आता नागपूरमध्ये घडलीय. या घटनेत एका जवानाने प्रेयसीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्येनंतर जवानाने दृष्यम स्टाईलमध्ये पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांना या हत्येचा उलगडा करण्यात यश आले आहे. (nagpur crime news indian army soldier kill his girl friend and misdirect nagpur police shocking crime story)
नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या हत्येतील आरोपीचे नाव अजय वानखेडे असे आहे, तो भारतीय सैन्यात कार्यरत आहे. अजय वानखेडे यांची मेंट्रीमोनिअल साईटवर जोत्स्ना आकरे या तरूणीशी भेट झाली होती. या भेटीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले होते. त्यानंतर दोघांनी अनेकदा संबंधही प्रस्थापित केले होते. तब्बल 2 वर्ष हा संपूर्ण प्रकार सूरू होता.
यानंतर जोत्सनाने अजय वानखेडेवर लग्नाचा तगादा लावायला सूरूवात केली होती. पण दोनदा घटस्फोट झालेल्या वानखेडेने या लग्नास विरोध केला होता. पण या विरोधानंतरही लग्नाचा तगादा हा कमी होत नव्हता. त्यामुळे अखेर जवानाने प्रेयसीच्या हत्येचा कट रचला होता.
हे ही वाचा : आई-बापाचं भांडण अन् पोराचा गेला जीव, बिबट्याने…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानाने प्रेयसीला बुटीबोरीजवळील एका निर्जनस्थळी नेले होते. येथे तिला दारू पाजली आणि बेशुद्ध झाल्यावर तिची हत्या केली होती. त्यानंतर तिचा मृतदेह जमिनीत पुरला होता. त्यानंतर पुरलेल्या ठिकाणावर झाडाचे पत्ते, फांद्या आणि दगड ठेवून घटनाक्रम लपवण्याचा प्रयत्न केला होता. जेणेकरून तिथे कोणतीही गोष्टी पूरल्याचे कळू नये. मात्र तरी देखील पोलिसांना सुगावा लागलाच.