Nandini Rajbhar : पलंगाखाली रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, महिला नेत्याची भरदिवसा हत्या!

मुंबई तक

ADVERTISEMENT

सुहेलदेव समाज पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस यांची अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली.
सुहेलदेव समाज पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस नंदिनी राजभर यांची हत्या, वार करून मारेकरी फरार
social share
google news

Nandini Rajbhar Latest News : सुभासपच्या (सुहेलदेव भारतीय समाज पार्टी) महिला नेत्या नंदिनी राजभर यांची भरदिवसा हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली. (State General Secretary of Suheldev Samaj Party Nandini Rajbhar murdered)

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस यांची अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणाची माहिती मिळताच राज्यात खळबळ उडाली. हे प्रकरण खलिलाबाद कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघा बायपास येथे घडली आहे.

नंदिनी राजभर यांच्यासोबत काय घडलं?

नंदनी राजभर यांचा मृतदेह घरातील एका खोलीत असलेल्या पलंगाखाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आलेले आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नंदनी राजभर या गेल्या अनेक वर्षांपासून सुहेलदेव भारतीय समाज पक्षात पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. सुहेलदेव समाज पक्षाने त्यांच्यावर पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवलेली होती. 

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान हा हल्ला केला. हत्येनंतर मृतदेह घरातच पडून होता. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिक टीमने मृतदेह ताब्यात घेतला.

ADVERTISEMENT

काही दिवसांपासून नंदिनी यांना दिल्या जात होत्या धमक्या

काही दिवसांपासून नंदिनी राजभर यांना धमक्या येत होत्या अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. त्यामुळे त्या तणावात होत्या. कोण धमकावत आहे, हे घरच्यांनी सांगितले नाही. 

ADVERTISEMENT

नंदिनी यांच्या सासू आरती देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या सायंकाळी चारच्या सुमारास घरी पोहोचल्या तेव्हा दरवाजा आतून उघडा होता. त्यांनी आत जाऊन नंदिनीला फोन करायला सुरुवात केली, पण प्रतिसाद मिळाला नाही. 

त्या नंदिनीच्या खोलीत गेल्या तेव्हा तिथे अंधार पडला होता आणि त्यांचा मृतदेह बेडजवळ जमिनीवर पडलेला दिसला. त्यांनी नंदिनी राजभर यांना आवाज दिला पण, प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी जवळ जाऊन नंदिनी यांचे डोके धरून त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT