Newsclick Raid : पत्रकारांच्या घरावर धाडी, मोबाईल-लॅपटॉप जप्त, प्रकरण काय?

मुंबई तक

न्यूजक्लिक वेबपोर्टलवर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून कारवाई करण्यात आली असून पत्रकारांच्या घरावर आणि कार्यालयावरही धाडी टाकण्यात आल्या आहेत. या कारवाईत पत्रकारांचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

newsclick receiving funding China delhi police action journalists laptops mobile phones seized allegation Enforcement Directorate
newsclick receiving funding China delhi police action journalists laptops mobile phones seized allegation Enforcement Directorate
social share
google news

Newsclick : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून राजधानी दिल्लीसह न्यूजक्लिक वेबसाईटच्या (Newsclick website) पत्रकारांवर धाड टाकण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून (Delhi Police special Cell) झालेली ही कारवाई फॉरेन फंडिंगप्रकरणी (Foreign Funding) झाल्याचे सांगण्यात येत आहे. पत्रकारांवर ही कारवाई UAPA अंतर्गत केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मंगळवारी सकाळपासून ही कारवाई करण्यात आली असून दिल्ली, नोएडा, गाजियाबाद (Delhi, Noida, Ghaziabad) या ठिकाणी पत्रकारांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, 30 पेक्षा जास्त ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. तर काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची माहिती स्पेशल सेलच्या पोलिसांनी सांगितली. (newsclick delhi police action receiving funding from china journalists laptops mobile phones seized allegation)

UAPA अंतर्गत कारवाई

पोलिसांनी धाड टाकल्यानंतर इलेक्ट्रॉनिक साहित्य, लॅपटॉप, मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. त्याच बरोबर हार्ड डिस्कमधील डाटाही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही UAPA अंतर्गत या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर पत्रकार अभिसार शर्माने सोशल मीडियावर पोस्ट करत दिल्ली पोलिसांनी आपला लॅपटॉप आणि त्यांचा फोन जप्त केला असल्याचे त्याने सोशल मीडियावर सांगितले आहे.

हे ही वाचा >> Nanded Hospital : नांदेडनंतर संभाजीनगरातही मृत्यूतांडव! ‘घाटी’त 10 रुग्णांचा मृत्यू

कारवाईत निमलष्करी दलही

UAPA अंतर्गत सुरू असलेल्या या कारवाईत स्पेशल सेलचे 100 हून अधिक पोलीस सहभागी आहेत. या कारवाईदरम्यान स्पेशल सेलबरोबरच निमलष्करी दलाचे जवानही यामध्ये सहभागी झाले आहेत. सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे निमलष्करी दलाचे जवान त्यांच्यासोबत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलीस सध्या कारवाईमध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे कारवाई पूर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन या कारवाईची माहिती सांगितली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या स्पेशल सेलचे सर्वच अधिकारी या कारवाईत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp