रुग्णालयात कामाचं प्रेशर वाढलं म्हणून नर्सचा भयानक प्रताप! तब्बल 10 रुग्णांना संपवलं अन् 27 रुग्णांच्या हत्येचा प्रयत्न...
आरोपी नर्सने रुग्णालयातील तब्बल 10 रुग्णांची हत्या आणि 27 रुग्णांची हत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कामाचं प्रेशर वाढलं म्हणून नर्सचा भयानक प्रताप!
तब्बल 10 रुग्णांना संपवलं अन् 27 रुग्णांच्या हत्येचा प्रयत्न...
Crime News: एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने वर्कलोड वाढल्याने भयानक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. आरोपी नर्सने रुग्णालयातील तब्बल 10 रुग्णांची हत्या आणि 27 रुग्णांची हत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील न्यायालयाने आरोपी महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असल्याचं सांगितलं जात आहे.
अधिक प्रमाणात औषधांचे डोस
ही घटना डिसेंबर 2023 ते मे 2024 दरम्यान, जर्मनी येथील वूर्सेलन (Wuerselen) शहरात असलेल्या एका रुग्णालयात घडली. सरकारी वकिलाच्या म्हणण्यानुसार, आरोपी नर्सने तिच्या रात्र पाळी म्हणजेच नाईट शिफ्टमध्ये वृद्ध रुग्णांना अधिक प्रमाणात वेदनाशामक आणि झोपेचे इंजेक्शन्स द्यायची. यामागे रुग्णांना लवकर झोप यावी आणि रात्रभर काम करावं लागू नये, हाच नर्सचा उद्देश होता. तपासात समोर आलं की, तिने अनेक रुग्णांना मॉर्फिन आणि मिडाझोलम नावाच्या औषधांचे जास्त डोस दिले होते. जास्त प्रमाणात ही औषधे दिल्याने ती जीवघेणी सुद्धा ठरू शकतात.
हे ही वाचा: नग्न अवस्थेत महिलेचा मुंडकं छाटलेला मृतदेह! दोन्ही हात सुद्धा... पोलिसांना 'तो' संशय
न्यायाधीश काय म्हणाले?
पोलिसांनी 2024 मध्ये आरोपी महिलेला अटक केली. न्यायालयात सरकारी वकिलांनी सांगितले की, काही रुग्णांकडे जास्त लक्ष आणि त्यांना अधिक वेळ द्यावा लागत असल्याने त्यांच्यावर नर्स चिडली. यावर, कोर्टात न्यायाधीशांनी सुद्धा सांगितलं की, आरोपी नर्सचे गुन्हे इतके गंभीर आहेत की तिला 15 वर्षांनंतर सुद्धा सुटकेची संधी मिळायला नको.
हे ही वाचा: पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याचं अजितदादांच्या सासरवाडीशी कनेक्शन, दिग्विजय पाटील आणि सुनेत्रा पवारांचं नातं काय?
तपास यंत्रणेचा शोध
संबंधित नर्सने आणखी लोकांची सुद्धा हत्या केली आहे का? या गोष्टीबाबत तपास यंत्रणा शोध घेत आहे. यासाठी, कबरीतून मृतदेह बाहेर काढून त्यांचा पुन्हा तपास केला जात आहे. यावरून, नवीन मृतांची ओळख पटू शकत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या तपासादरम्यान, अधिक पुरावे मिळाल्यास नर्सविरुद्ध पुन्हा खटला चालू शकतो. जर्मनीमध्ये 1999 ते 2005 दरम्यान, असंच एक प्रकरण घडलं होतं. यामध्ये, नील्स होगेलला आरोपी ठरवण्यात आलं होतं. या आरोपीने तब्बल 85 रुग्णांची हत्या केल्याची माहिती आहे. जर्मनीच्या आधुनिक इतिहासातील सर्वात मोठा सिरीयल किलर म्हणून नील्स होगेलला ओळखले गेलं होतं.










