Crime: जेवणात दररोज द्यायचा विष…, जावयाने सासूला का संपवलं?
हैद्राबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील एका लग्न झालेल्या जोडप्यामध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद इतका टोकाला पोहोचला की महिलेने त्याच्या पतीला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती.
ADVERTISEMENT
हैद्राबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील एका लग्न झालेल्या जोडप्यामध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद इतका टोकाला पोहोचला की महिलेने त्याच्या पतीला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. या नोटीसीनंतर नवरा संतापला आणि त्याने
बायकोचं कुटुंबचं संपवण्याचा कट रचला होता. ज्याप्रमाणे आरोपी पतीने बायकोचं कुटुंब संपवण्याचा कट रचला, तो पाहून पोलिसांना देखील घाम फुटला आहे. (pharmacist husband poisons wife and her family arsenic spices shocking crime story)
ADVERTISEMENT
घटनाक्रम काय ?
हैद्राबादमध्ये (Hyderabad) राहणाऱ्या फार्मासिस्ट अजित कुमार आणि शिरीषा यांचे 2018 साली लग्न झाले होते. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. या लग्नानंतर अजित कुमारने शिरीषाचा मानसिक छळ करायला सुरुवात केली होती.या छळानंतर अजित कुमार युकेला गेला होता.युकेला जाण्यापूर्वी त्याने शिरीषाचे आणि मुलीचा योग्य सांभाळ करण्याचे आश्वासन दिले होते. अजितवर विश्वास ठेवून शिरीषा मुलीसह काही दिवसांनी युकेला पोहोचली. मात्र तरी देखील अजित कुमार अजिबात सुधरला नव्हता. त्याने युकेतही शिरीषाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरुच ठेवला होता.
हे ही वाचा : Burari Rape Case : सैतानी कृत्ये! वडिलाचा मृत्यू… ‘मामा’ 4 महिने करत राहिला बलात्कार
अजित कुमारच्या या सततच्या छळाला कंटाळून शिरीषाने त्याच्यासोबत वेगळे राहण्याचा निर्णय़ घेतला. त्याप्रमाणे तिने वेगळे राहण्यासही सुरुवात केली. यानंतर शिऱीषाने अजित कुमारला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. या नोटीसीनंतर अजित कुमार संतापला आणि त्याने शिरीषाच्या कुटुंबांच्या हत्येचा कट रचला.
हे वाचलं का?
शिरीषाच्या भावाच्या लग्नात रचला कट
शिरीषाच्या भावाचे जूनमध्ये लग्न होते. या लग्नात शिरीषा सहभागी झाली होती. तसेच शिरीषाचे संपूर्ण कुटुंब देखील या लग्नासाठी एकत्र आले होते. या लग्नात घटस्फोटाची नोटीस देऊन सुद्धा शिरीषाचा नवरा पोहोचला होता. यावेळी लग्नाच्या कार्यक्रमात जेवणानंतर नातेवाईकांना गंभीर पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला होता. या घटनेत शिरीषाची आई उमा माहेश्वरी हिची तब्येत इतकी खालावली की तिला रूग्णालयात दाखल करावे लागले होते. पण या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने शिरीषाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता.
या घटनेनंतर देखील शिरीषाच्या घरात आजारपण सुरुच होते. जुलै महिन्यात देखील शिरीषाच्या भावाची आणि वडिलांची तब्येत खालावली होती. त्यांना देखील याच आजारपणांचा सामना करावा लागला होता. काही दिवसांनी शिरीषाची मुलगी देखील आजारी पडली होती. दरम्यान शिरीषाला तिच्या आईचा मृत्य जेवणातून मिसळलेल्या विषामुळे झाल्याची माहिती डॉक्टरांकडून प्राप्त झाली होती. त्यामुळे तिला अजित कुमारवर संशय आला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Sana Khan Murder : सना, सेक्स्टॉर्शन आणि ग्राहकांसोबत संबंध; पोलिसांच्या हाती स्फोटक माहिती
या प्रकरणी शिरीषाने पोलीस ठाण्यात जाऊन अजित कुमार विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीने तिने जेवणात मिसळलेल्या विषामुळे तिच्या आईचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तसेच तिने पुढे खळबळजनक गोप्यस्फोट केला. अजित कुमारने शिरीषाच्या माहेरच्या घरातील मीठाच्या डब्यात आणि मिरची पावडरमध्ये आर्सेनिक विष मिसळले होते. यामुळे घरातील कुटुंबिय आजारी पडत होते आणि त्यांचा मृत्यू होत होता.शिरीषाच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी अजित कुमार विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान अजित कुमारने शिरीषाच्या घऱातील मीठ आणि मिरची पावडरमध्ये आर्सेनिक विष मिळवून त्यांच्या हत्येचा कट रचला होता. या घटनेनंतर आरोपी अजित कुमारने ब्रिटेनला पळ काढला होता. आता पोलिसांनी फार्मासिस्ट अजित कुमारसह सहा इतर आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींनी पोलिसांनी अटक देखील केले आहे. या घटनाक्रमाने शहर हादरलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT