Rajasthan News : ती ओरडत होती पण…, गर्भवती पत्नीची गावातून काढली नग्न धिंड
Rajastan News : चार महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीची पतीनेच धिंड काढल्याची घटना राजस्थानात घडली. या प्रकरणी पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
Rajasthan Pratapgarh : राजस्थानतील प्रतापगड जिल्ह्यातून समोर आलेल्या व्हिडीओ देशात खळबळ उडालीये. एका गरोदर आदिवासी महिलेची संपूर्ण गावातून नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. इतकेच नाही, तर अमानुषपणे मारहाण करण्यात आली. हे घृणास्पद कृत्ये तिच्या पतीनेच केले. हा व्हिडिओ व्हायरल होताच राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले. (A pregnant tribal woman was paraded naked in front of the crowd in the entire village and brutally assaulted by husband)
ADVERTISEMENT
तत्काळ कारवाई करत पोलीस विभागाने मुख्य आरोपीसह 10 जणांना अटक केली असून, एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राजस्थानमध्ये काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती आणि आरोपींनी तिचा मृतदेह कोळशाच्या भट्टीत जाळला होता.
ती विनवण्या करत होती अन् लोक तिला नग्न करताना बघत राहिले
1 सप्टेंबर रोजी प्रतापगड जिल्ह्यातील एका गावात 21 वर्षीय महिलेला विवस्त्र करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. येथे गरोदर महिलेला विवस्त्र करून गावातून धिंड काढण्यात आली. व्हिडीओमध्ये महिला रडताना दिसत आहे. ती आरोपी पतीला तिला सोडून देण्याची विनवणी करत होती. तिने स्वत:ला पतीच्या हातातून सोडवण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Amravati crime : दिवाण बेडमधून पडत होतं रक्त, आतमध्ये सापडले मायलेकाचे मृतदेह
पती तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत राहिला, तिच्या विनवण्यांचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. शेजारी उभे असलेले लोक पीडितेचे कपडे उतरवताना फक्त बघत राहिले. काहीजणांनी तर निर्लज्जपणे मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवले. पत्नीला निर्वस्त्र केल्यानंतर आरोपीने महिलेला गावभर फिरवले. हे करताना पत्नी 4 महिन्यांची गरोदर असल्याचं भान त्याला नव्हते.
राजस्थानसह संपूर्ण देशात उडाली खळबळ
महिलेसोबत केलेल्या या अमानुष कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखा व्हायरल झाला. राज्यात खळबळ उडाली होती. भाजपने राजस्थान सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारवर आरोप सुरू झाले. या प्रकरणाचा संदर्भ मणिपूरमधील त्या घटनेसोबत जोडला गेला. विरोधकांनी घेरताच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करून आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिले.
ADVERTISEMENT
12 तासात सर्व आरोपींना अटक
ही घटना घडवून आणणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी 30 पथकांनी ठिकठिकाणी छापे टाकले. 12 तासांच्या आत पोलिसांनी मुख्य आरोपी कान्हा याचा मुलगा लालिया, नथू यांचा मुलगा नागजी मीना, वेनिया यांचा मुलगा भेरा रा. पहाडा लोअर कोटा, पिंटू यांचा मुलगा भेरिया, खेतिया यांचा मुलगा लांब्या मीना, मोती लाल यांचा मुलगा रामा आणि पुनिया यांना अटक केली. बाबरिया मीनाचा मुलगा केसरा, मानेंग मीनाचा मुलगा केसरा, केसराचा मुलगा सूरज आणि नेतियाचा मुलगा पंचियाचा (रहिवासी पहाडा लोअर कोटा) यांना अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT
पोलिसांपासून पळून जाण्याच्या प्रयत्नात मुख्य आरोपीचा पाय मोडला. यासोबतच पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
पाच सदस्यीय एसआयटी स्थापन करण्यात आली
या प्रकरणी अतिरिक्त पोलीस महासंचालक गुन्हे दिनेश एमएन यांच्या देखरेखीखाली एसआययूसीएडब्ल्यू प्रतापगढचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश मीना, सीओ धारियावाड धनफूल मीना, सीओ मावली उदयपूर कैलाश कुंवर, एसएचओ धारियावाड पेशावर खान आणि एसएचओ लादी खान यांचा समावेश असलेली पाच सदस्यीय एसआयटी. सायबर पोलीस स्टेशन प्रतापगड पूजा स्थापन करण्यात आली आहे.
हेही वाचा >> Thane Crime: बायकोची गोळी झाडून हत्या, पुढच्याच क्षणी हार्ट अटॅकने नवऱ्याचा मृत्यू
पोलीस महासंचालक उमेश मिश्रा म्हणाले की, पोलीस महानिरीक्षक बांसवाडा क्षेत्र आणि पोलीस अधीक्षक प्रतापगढ यांच्या देखरेखीखाली स्थापन करण्यात आलेली एसआयटी घटनेच्या सर्व पैलूंचा तपास करेल आणि अहवाल राज्य सरकार आणि पोलीस मुख्यालयाला सादर करेल आणि तांत्रिक आणि वैज्ञानिक पुरावे गोळा केल्यानंतर प्रकरणाचा निपटारा करेल. या प्रकरणी धारियावाड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध आयपीसी, महिलांचे अश्लील नियंत्रण कायदा आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी नोकरी आणि १० लाखांची मदत
याप्रकरणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी धारियावाडमध्ये पीडितेची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी पीडितेला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली. तसेच 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
गेहलोत म्हणाले की, आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवला जाईल आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. ते म्हणाले, “अशा दुःखद आणि अमानवी घटनांचा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमुखाने निषेध केला पाहिजे.”
भाजपने उपस्थित केला प्रश्न
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते सतीश पुनिया यांनी राजस्थान सरकारला अनेक प्रश्न विचारले. ते म्हणाले, ‘अशोक गेहलोत जी, तुमच्याकडे या क्रूरतेला काही उत्तर आहे का? राजस्थानातील महिलांवरील वाढत्या भीषण गुन्ह्यांच्या क्रौर्याबद्दल तुम्ही ओरड करत आहात आणि महिलेची प्रतिष्ठा वाचवण्याऐवजी खुर्ची टिकवण्याच्या राजकारणात व्यस्त आहात, अशा खुर्चीची लाज आणि असे राजकारण केवळ जनतेलाच नव्हे तर आता देव माफ करणार नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT