Pune : बायकोच्या नरडीचा घेतला घोट, मुलं फेकली विहिरीत; सुसाईड नोट वाचून पोलीस हादरले!
Pune Murder Case : पुण्याच्या दौड तालूक्यातील वरवंड गाव दिवेकर हत्याकांडाने हादरले आहे. या हत्याकांडात पेशाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीने आपल्याच पत्नीचा गळा घोटून खून केला होता, तर दोन मुलांना विहरीत फेकून दिले होते. यानंतर डॉक्टराने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली होता.
ADVERTISEMENT
Pune Murder Case : पुण्याच्या दौड तालूक्यातील वरवंड गाव दिवेकर हत्याकांडाने हादरले आहे. या हत्याकांडात पेशाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीने आपल्याच पत्नीचा गळा घोटून खून केला होता, तर दोन मुलांना विहरीत फेकून दिले होते. यानंतर डॉक्टराने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली होती. संपूर्ण कुटुंबाच्या या मृत्यूनंतर पुणे हादरले होते. या हत्याकांडानंतर पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमुळे हत्याकांडामागच खरं कारण समोर आले आहे. (pune animal doctor kill his family wife chindren dies shocking crime story)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
दौंड शहरातील वरवंड परिसरातील चैत्राली सोसायटीमध्ये डॉ. अतुल दिवेकर यांचे कुटुंबीय राहायला होते. डॉ. दिवेकर पशुवैद्यकीय तज्ज्ञ आहेत. तर त्यांची पत्नी पल्लवी दिवेकर (वय 39) या एका शाळेत शिक्षका म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान मंगळवारी (20 जूनला) दिवसभर दिवेकर कुटुंबीयांच्या घराचा दरवाजा बंदच होता. घरात काही हालचाल नसल्याने त्यांच्या शेजाऱ्यांना संशय आला होता. शेजाऱ्यांनीघराचा दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला,पण आतून कोणताच प्रतिसाद दिला नाही.
हे ही वाचा : ‘तो’ Video पाहिला, 700 किमी प्रवास करत आला अन् घटस्फोट घेतलेल्या बायकोला…
शेजाऱ्यांनी नंतर दरवाजा उघडताच त्यांना धक्काच बसला.कारण घरात डॉ. अतुल दिवेकर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले होते.त्यांच्या शेजारीच खाली त्यांच्या पत्नी पल्लवी दिवेकर यांचा मृतदेह पडलेला होता. त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले.शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती दौंड पोलिसांना दिली.
हे वाचलं का?
दोन मुलांचा खुन करून विहरीत टाकलं
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता, त्यांच्या हाती डॉ. दिवेकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट लागली. या सुसाईड नोटमध्ये ‘मी आत्महत्या करत असून, पत्नी आणि दोन लहान मुलांचा खून केला आहे. मुलांचे मृतदेह शेजारी असलेल्या विहिरीत टाकून दिले आहेत, अशी माहिती मिळाली.
आदिवत अतुल दिवेकर (वय 9), वेदांती अतुल दिवेकर (वय 6) अशी दिवेकर यांच्या दोन मुलांची नावे आहेत. ही माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेहाच्या शोध लावण्यासाठी विहिर उपसायला सुरु केली होती. मंगळवारी रात्री उशिरापर्यत ही शोधाशोध सुरू केली होती, त्यानंतर पोलिसांच्या हाती मृतदेह लागले होते.
हत्येमागचं कारण आलं समोर
पोलिसांना घटनास्थळावरून सापडलेल्या सुसाईड नोटमधून हत्याकांडा मागचं खऱं कारण समोर आले आहे. सुसाईड नोटमध्ये डॉक्टर दिवेकर यांनी पत्नी गैरवर्तन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अतुल आणि पल्लवी यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून शुल्लक कारणावरून भांडणे होत होती. दररोजच्या या भांडणाला कंटाळून त्यांनी हे टोकाच पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. तसेच घटनेपुर्वी दोघांमध्ये कडाक्याची भांडणे झाली होती. याचाच अतुलला राग आला आणि त्याने संपूर्ण कुटुंबाला संपवले असल्याची माहिती आहे. दरम्यान सध्या या पुण्यातील हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरलं आहे.सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Sakinaka Crime: मुंबई हादरली, आधी दोघं रिक्षात बसले.. नंतर तरुणीचा गळाच चिरला!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT