पुण्यात गरबा खेळताना राडा! डोक्यात घातली बिअर बाटली, कारण…
पुण्यामध्ये एका दांडिया कार्यक्रमात काठी लागल्याचे निमित्त होऊन एका युवकावर तिघांनी हल्ला केला आहे. काठी लागताच युवकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला जखमी करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
Pune Crime: नवरात्रोत्सवानिमित्त अनेक शहरात दांडिया (Dandiya) खेळाचे कार्यक्रम सुरु आहेत. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरही दांडिया खेळताना वाद होऊन एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली (beer bottle) फोडून त्याच्या तीक्ष्ण हत्याराने वार केला आहे. या हल्ल्यात अक्षय कांबळे हा युवक जखमी झाला असून या प्रकरणी पोलिसात (Sinhagad Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी युवकावर हल्ला करुन ते पसार झाल्याने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
दांडिया खेळताना वाद
पुण्यातील सिंहगड रस्त्याशेजारी दांडिया खेळण्यासाठी अक्षय कांबळे आणि त्याचे काही मित्र गेले होते. दांडियाचा कार्यक्रम सुरु झालेला असतानाच एकमेकांना काठी लागली आणि वादाची ठिणगी पडली. दांडिया खेळताना अक्षयचा वाद झाल्यानंतर तो आणि त्याचे मित्र कार्यक्रमातून बाहेर पडले होते. त्यावेळी वाटेत अडवून अक्षयच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याच्या धारधार शस्राने वारही करण्यात आले. यामध्ये अक्षय जखमी झाला असून त्याला त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा >> मावस बहिणीला ज्यूसमधून दिलं गुंगीचं औषध, बलात्कार केला अन्…; वाचा Inside Story
डोक्यात बिअरची बाटली फोडली
दांडिया खेळताना काठी लागल्याचे निमित्त झाले आणि अक्षयबरोबर दांडियाच्या कार्यक्रमात वाद झाला. त्यावेळी हा वाद इतका टोकाला गेला की अक्षयला वाटेत अडवून त्याच्यावर डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला जखमी करण्यात आले आहे.
हे वाचलं का?
गुन्हा दाखल
दांडिया खेळताना धायरीमधील अक्षय कांबळे (वय 25) याच्यावर हल्ला करुन त्याला जखमी करण्यात आले आहे. यावेळी त्याच्यावर हत्यारानेही वार केल्याने या प्रकरणी हल्लेखोरांविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
हे ही वाचा >>Nilesh Rane : राणेंच्या पुत्राचा ‘राजकीय संन्यास’; नीलेश राणेंनी का सोडलं राजकारण?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT