पुण्यातील कोयता गँगचा हा नवा Video तुम्हाला टाकेल हादरवून, भर रस्त्यात...

मुंबई तक

Pune Crime News : पुण्यातील दत्तवाडी परिसरात तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आली आहे. या हल्ल्याचे कारण आता समोर आले आहे.  

ADVERTISEMENT

Pune Crime News Koyata Gang Viral Video
Pune Crime News Koyata Gang Viral Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी क्षेत्रात वाढ निर्माण झाली आहे.

point

पुण्यातील दत्तवाडी परिसरात तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे.

Pune Crime News : पुणे शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ निर्माण होत आहे. पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेनं पोलिसांसोबत चिकनची पार्टी केल्याची घटना ताजी आहे. त्यानंतर आता पुण्यातील दत्तवाडी परिसरात तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोयता गँगने पुण्यात पुन्हा दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्याचे कारण आता समोर आले आहे.  

हेही वाचा : बकऱ्या चारणाऱ्या वृद्ध व्यक्तीसमोर न्यूड होऊन अत्यंत अश्लील चाळे करणाऱ्या त्या तरुणीबाबत 'ती' गोष्ट आली समोर!

दरम्यान, स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. सध्या पीडित युवकावर उपचार सुरू आहेत. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर लक्षात येतं की, हल्लेखोरांनी तरुणावर कोयत्याने अनेक सपासप वार केले आहेत. त्यानंतर कोयत्या गँगचे हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले आहेत. 


सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

हत्येचं गुढ उकललं

या प्रकरणात आता पुणे पोलिसांनी लक्ष्य घालत तपासास सुरूवात केली आहे. गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी दत्तवाडी पोलिसांनी विशेष पथक जारी केलं आहे. या तपासातून हा हल्ला पूर्ववैमन्यस्यातून झाला असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकारी सध्या सीसीटीव्ही फुटेज पाहूण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

संबंधित प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावी असे आश्वासन दिलं आहे. या घटनेमुळे कोयता गँगच्या दहशतीने डोके वर काढले आहेत. यामुळे आता पुण्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोयता गँगने अनेकदा दागिने लुटण्याचे आणि मालमत्तेची तोडफोड केली आहे. 

हेही वाचा : बकऱ्या चारणाऱ्या आजोबासोबत न्यूड होऊन अश्लील चाळे करणाऱ्या तरुणीचा आणखी एक Video आला समोर, दुसऱ्या तरुणासमोरही...

अशा गुन्हेगारांविरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मकोका लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. धारदार शस्त्र आणि कोयता बाळगणाऱ्या गुन्हेगारांच्या वाढत्या धाडसामुळे पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp