Pune crime : जावयाचा प्रताप! सासूकडून 10 लाख उकळण्यासाठी स्वतःच्या मुलीचं…
pune crime news marathi : पिंपरी चिंचवडमधील वाघोली परिसरात अपहरणाची वेगळी घटना समोर आली आहे. जावयाने सासूकडून 10 लाख रुपये उकळण्यासाठी स्वतःच्या मुलीसह मेहुणीच्या मुलीचंही अपहरण केले.
ADVERTISEMENT
-कृष्णा पांचाळ, पिंपरी चिंचवड
ADVERTISEMENT
Pimpri Chinchwad news marathi : पैशासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. अनेकजण कष्ट न करता श्रीमंत होण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात. पण, पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये एका जावयाने सासूकडून 10 लाख रुपये उकळण्यासाठी स्वतःच्या मुलीसह मेहुणीच्या मुलीचं अपहरण केलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. जावयाने सासूकडून 10 लाख रुपये उकळण्यासाठी त्याच्या आणि मेहुण्याच्या मुलीचे अपहरण केले. हद्द म्हणजे त्याने कुटुंबीयांसह पोलिसांत दोन्ही मुलींच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Sudhir More : ठाकरे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाचे झाले अनेक तुकडे
10 लाखांसाठी अपहरण, नेमकं काय घडलं?
पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी रक्षाबंधनानिमित्त पंधरा व दोन वर्षांच्या अल्पवयीन मुली राखी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडल्या. मात्र बराच वेळ उलटून गेला तरी घरी पोहोचल्या नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. कुठेच त्या सापडल्या नाहीत त्यामुळे कुटुंबीयांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पत्नीच्या मोबाईलवर कॉल करून दिली धमकी
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. अपहरणानंतर काही तासांनी आरोपीने पत्नीला तिच्या मोबाईलवर कॉल करून सांगितले की, तुमच्या मुलींना सुरक्षित ठेवायचे असेल तर पोलिसांना न सांगता 10 लाख रुपये द्या. पैसे न दिल्यास मुलींना इजा पोहोचवू, अशी धमकीही त्याने दिली.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ISRO मध्ये नोकरी कशी मिळवायची? पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
असं फुटलं बिंग
यावेळी पोलिसांना आरोपीवर संशय आला आणि चौकशीदरम्यान त्याने वेगवेगळी उत्तरं देण्यास सुरूवात केली. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने सांगितले की, त्यानेच त्याच्या मुलीचे आणि मेहुणीच्या मुलीचे अपहरण केले होते. सासूला मिळालेल्या 30-40 लाख रुपयांपैकी 10 लाख रुपये त्याला हवे होते. त्याने दोन्ही मुलींना वाघोली येथील घरात डांबून ठेवले. यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलींची सुटका करून जावयाला अटक केली.
ADVERTISEMENT
तीन महिन्यांपूर्वी रचला होता कट
आरोपीने चौकशीत पोलिसांना सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी त्याने त्याच्या मुलीचे आणि मेहुणीच्या मुलीचे अपहरण करून त्याच्या सासूकडून पैसे उकळण्याचा कट रचला होता. त्यामुळे त्याने तीन महिन्यांपूर्वी आपल्या मेहुणीचा मोबाईल चोरला होता. त्यानंतर तोच मोबाईल वापरून त्याने अपहरणाची घटना घडवली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT