Pune Crime : समलैंगिक संबंध अन् भररस्त्यात कोयत्याने हत्या; पुण्यात तरूणासोबत काय घडलं?
पुण्याच्या वाघोलीत ही घटना घडली आहे. या घटनेत आरोपीने 21 वर्षीय तरूणावर कोयत्याने वार केला होता. भररस्त्यात हा संपूर्ण प्रकार घडला होता. या हल्ल्यानंतर पिडीत तरूण रस्त्यावर जखमी अवस्थेत व्हिव्हळत पडला होता.
ADVERTISEMENT
Pune crime News : पुण्यात (Pune) गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. क्षुल्लक क्षुल्लक कारणावरून हत्या करण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका तरूणाची धारदार शस्त्राने (koyta gang) वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. महेश डोके (21) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत. (pune crime story man stabbed to death by gay love affair partner bba student shocking crime story)
पुण्याच्या वाघोलीत ही घटना घडली आहे. या घटनेत आरोपीने 21 वर्षीय तरूणावर कोयत्याने वार केला होता. भररस्त्यात हा संपूर्ण प्रकार घडला होता. या हल्ल्यानंतर पिडीत तरूण रस्त्यावर जखमी अवस्थेत व्हिव्हळत पडला होता. याच दरम्यान एका व्यक्तीची नजर पिडीत तरूणावर पडली आणि त्याने तत्काळ तरूणाच्या मदतीसाठी धाव घेतली. यावेळी तत्काळ तरूणाला गाडीत बसवून रूग्णालयात नेले,मात्र तेथील रूग्णांनी त्याला ससून रुग्णालयात रेफर केले. पण रूग्णालयात पोहोचण्यास खुप उशीर झाल्याने तरूणाचा प्रवासा दरम्यानच मृत्यू झाला होता.
हे ही वाचा : Tunnel Rescue : 41 मजुरांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारा ‘देवदूत’, कोण आहेत Arnold Dix?
मृत तरूण हा बीजीएस कॉलेजमध्ये वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तो वाढेबोलाही एका हॉस्टेलमध्ये राहत होता. या तरूणाची हत्या समलैंगिक संबंधातून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलीस आता समलैंगिक पार्टनरचा शोध घेत आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल करून घेतली आहे. तसेच आरोपी तरूणाचाही तपास सूरू केला आहे. लोणीकंद पोलिसांनी या प्रकरणी तपास करायला सुरुवात केली आहे. तसेच मृतदेहाला पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
हे ही वाचा : Deepak Kesarkar अचानक का गेले नारायण राणेंच्या घरी? ‘त्या’ बॅगेतून राणेंना काय दिलं?
दरम्यान याआधी ठाण्यात एका पोटच्या पोरानेच आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईने दिलेले जेवण स्वादिष्ट न लागल्याने तरूणाने संतापून विळ्याने गळ्यावर वार करून तिची हत्या केली होती. या हत्येनंतर आरोपी मुलगा आईला रक्ताच्या थारोळ्यात सोडून बेडरूममध्ये जाऊन झोपी गेला होता.या घटनेने ठाणे हादरले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT